आयटी कंपनीतील युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी सहकाऱ्यांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:11 IST2021-05-08T04:11:36+5:302021-05-08T04:11:36+5:30
पुणे : माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील युवतीला वरिष्ठ सहकारी त्रास देत होता. तिने व्यवस्थापनाकडे तक्रारही केली. मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ...

आयटी कंपनीतील युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी सहकाऱ्यांविरोधात गुन्हा
पुणे : माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील युवतीला वरिष्ठ सहकारी त्रास देत होता. तिने व्यवस्थापनाकडे तक्रारही केली. मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने तिने शेवटी पोलिसांकडे धाव घेतली. युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी सात वरिष्ठ सहकाऱ्यांविरोधात येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
संजय दास, शिवी कालिया, मार्क डिसिल्व्हा, हिमांशू शर्मा, इम्रान खान, नितांश कुट्टी, हर्षद सोईन अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. यासंदर्भात युवतीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दास हा कंपनीत वरिष्ठ सहकारी (टिम लिडर) आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून दासने युवतीला त्रास देण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. दासकडून त्रास देण्याचा प्रकार सुरूच असल्याने तिने कंपनीच्या व्यवस्थापनाकडे तक्रारही केली होती. मात्र, व्यवस्थापनाने काणाडोळा केला, असे युवतीने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा तपास सुरू असल्याचे येरवडा पोलिसांनी सांगितले.