कोरोनाचा नियम न पाळल्याने नवरदेवासह वरपित्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:12 IST2021-03-17T04:12:47+5:302021-03-17T04:12:47+5:30

पिंगळवाडी येथील नवरदेव गणेश रोहीदास खुटाण, लग्न कार्यमालक रोहीदास देवराम खुटाण, डिजे व ऑपरेटर विशाल नारायण बो-हाडे, गणेश सदाशिव ...

Crime against the bride and groom for not following Corona's rules | कोरोनाचा नियम न पाळल्याने नवरदेवासह वरपित्यावर गुन्हा

कोरोनाचा नियम न पाळल्याने नवरदेवासह वरपित्यावर गुन्हा

पिंगळवाडी येथील नवरदेव गणेश रोहीदास खुटाण, लग्न कार्यमालक रोहीदास देवराम खुटाण, डिजे व ऑपरेटर विशाल नारायण बो-हाडे, गणेश सदाशिव फलके (रा. आमोंडी) यांचेवर विनापरवाना वरात काढली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार पोलीस शिपाई अमोल काळे यांनी केली आहे.

रोहीदास खुटाण यांचे घराचे जवळ मोकळया जागेत सोमवारी (दि. १५) रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास लग्नाचे वराती निमित्त मानवी जिवितास धोकादायक असलेल्या कोरोना या विषाणुचा प्रादुर्भाव पसरण्याची जाणीव असतानाही विनामास्क, सोशल डिस्टन्सचे पालन न करता सुमारे १५० ते २०० लोक जमवून वेळेचे बंधन न पाळता विनापरवाना डि. जे. सिस्टीमवर मोठया कर्कश आवाजात गाणी वाजवून सर्वोच्च न्यायालयाचे अटी व शर्तीचे उल्लंघन व कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सूचना आणि जिल्हाधिकारी यांचे आदेश न पाळल्यामुळे नवरदेव, लग्न कार्यमालक, डिजे मालक व ऑपरेटर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदिप लांडे, आतिश काळे करत आहे.

Web Title: Crime against the bride and groom for not following Corona's rules