गोमांस वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हा

By Admin | Updated: June 21, 2016 00:22 IST2016-06-21T00:22:50+5:302016-06-21T00:22:50+5:30

पुणे-नाशिक महामार्गावर मंचर शहराच्या हद्दीत गोमांस वाहतूक करणारा टेम्पो पोलीस व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रात्री पकडला. एक टन गोमांस जप्त करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

Crime against beef traffickers | गोमांस वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हा

गोमांस वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हा

मंचर : पुणे-नाशिक महामार्गावर मंचर शहराच्या हद्दीत गोमांस वाहतूक करणारा टेम्पो पोलीस व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रात्री पकडला. एक टन गोमांस जप्त करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. याप्रकरणी युनूस हुसेन शेख (वय ४२, रा. शिपाई मोहल्ला, जुन्नर) व इमाम खलील खान (वय ३३, रा. कुर्ला ईस्ट, नेहरूनगर) यांच्याविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार : पुणे-नाशिक महामार्गावर साळी हॉस्पिटलसमोर शनिवारी रात्री गोमांस वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात आला. जुन्नरकडून मुंबईकडे जाणाऱ्या पिक-अप टेम्पो (एमएच २६ एच ४१६८) मधून गोमांस घेऊन जात असल्याचा संशय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना आला. त्यांनी ही माहिती मंचर पोलिसांना दिली. पोलिसांनी महामार्गावर बॅरिकेड लावून टेम्पो अडविला. त्यामध्ये १ टन गोमांस आढळले. वैद्यकीय अधिकारी डॉ. चिखले व डॉ. निघोट यांनी तपासणी केली त्या वेळी ते गोमांस असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र बुरुड याने फिर्याद दिली. युनूस हुसेन शेख (वय ४२, रा. जुन्नर) व इमाम खलील खान (वय ३३, रा. नेहरूनगर) या दोघांच्याविरोधात मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, १ लाख रुपये किमतीचे १ टन गोमांस व टेम्पो पोलिसांनी जप्त केला. आज मंचर ग्रामपंचायतीने गोमांसाची विल्हेवाट लावली. या वेळी बजरंग दलाचे तालुकाध्यक्ष सुहास बाणखेले, उपसरपंच महेश थोरात, दत्तप्रसाद गाढवे, सचिन पठारे, अभय चिखले, विशाल थोरात, कुणाल बाणखेले, गणेश पिंगळे, अभय राजगुरू, विशाल बाणखेले, शुभम गवळी, प्रसाद बोऱ्हाडे, प्रतीक बनबेरू आदी उपस्थित होते. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल करीत आहेत.

Web Title: Crime against beef traffickers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.