लहानपणापासून क्रिकेटची आवड
By Admin | Updated: March 29, 2015 00:28 IST2015-03-29T00:28:15+5:302015-03-29T00:28:15+5:30
वयाच्या १४व्या वर्षापासून मला क्रिकेट या खेळाची आवड निर्माण झाली. क्रिकेट क्लब होता, तिथे मुले क्रिकेट खेळायला येत असत आणि मी त्यांचा खेळ पाहत बसायचो.

लहानपणापासून क्रिकेटची आवड
पुणे : वयाच्या १४व्या वर्षापासून मला क्रिकेट या खेळाची आवड निर्माण झाली. क्रिकेट क्लब होता, तिथे मुले क्रिकेट खेळायला येत असत आणि मी त्यांचा खेळ पाहत बसायचो. असेच काही दिवस गेले. मग ते मला फिल्डिंग करायला सांगायचे, अशाप्रकारे माझ्या मनात क्रिकेटविषयी गोडी वाढत गेली आणि खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याची सुरुवात झाली, अशा आठवणी माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांनी सांगितल्या.
राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र प्रकाशित, ब्रेल जागृती मराठी ब्रेल त्रैमासिक आयोजित दृष्टिहीन नागरिकांसाठी बोर्डे यांच्या मुलाखतीचे शनिवारी आयोजन केले होते. या वेळी राष्ट्रीय दृष्टिहीन महाराष्ट्र संघाचे महादेव गुरव, राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे सचिव प्रकाश पंडागळे, उपाध्यक्ष राजीव हरिभगत, राष्ट्रीय दृष्टिहीन संघ पुणे विभागाचे बाबासाहेब राऊत आदी उपस्थित होते.
मुलाखतीमध्ये बोर्डे यांच्या घरची परिस्थिती, त्यांना त्यांच्या घरातून मिळालेले खेळासाठीचे प्रोत्साहन, कोणते सामने जिंकले, कोणते हारले, क्रिकेट हा खेळ पैशासाठी कधी खेळलो नाही, आवड होती म्हणून खेळलो, चंदू बोर्डे हे नाव जगभर कसे झाले, सोळाशे धावा करणारा एकमेव भारतीय म्हणून बोर्डे यांची ओळख, इंग्लंडमध्ये जेव्हा त्यांनी क्रिकेटचा सामना खेळला, तेव्हा त्यांना उपाधी कशी मिळाली, यांसारखे अनेक गमतीदार आणि थरारक किस्से या मुलाखतीतून उलगडत गेले.
मुलाखतीनंतर बोर्डे यांनी उपस्थितांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. (प्रतिनिधी)
४बोर्डे यांनी एक मजेदार किस्सा सांगितला. सुरुवातीच्या काळात त्यांची क्रिकेट खेळाला नुकतीच सुरुवात झाली होती. त्या दरम्यान त्यांनी एक सामना खेळला. त्या सामन्यात त्यांनी १०६ धावा केल्या होत्या. तेव्हा त्यांना मैदानावरील लोकांनी उचलून घेतले. त्यामध्ये अभिनेते अमिताभ बच्चनसुद्धा होते. नंतर आमच्या भेटी वाढत गेल्या, अशी आठवण त्यांनी सांगितली.