क्रिकेट नेक्स्ट, स्टार स्पोर्ट्स यांचे विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:13 IST2021-03-26T04:13:37+5:302021-03-26T04:13:37+5:30

पुणे : १२ वर्षांखालील चॅम्पिअन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट नेक्स्ट अकादमी आणि स्टार स्पोर्ट्स संघांनी विजय मिळवले. पहिल्या लढतीत ...

Cricket Next, Star Sports wins | क्रिकेट नेक्स्ट, स्टार स्पोर्ट्स यांचे विजय

क्रिकेट नेक्स्ट, स्टार स्पोर्ट्स यांचे विजय

पुणे : १२ वर्षांखालील चॅम्पिअन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट नेक्स्ट अकादमी आणि स्टार स्पोर्ट्स संघांनी विजय मिळवले.

पहिल्या लढतीत स्टार स्पोर्टस अकादमी ब संघाने प्रथम फलंदाजी करताना १०.४ षटकांत सर्वबाद ४२ धावा केल्या. क्रिकेट नेक्स्ट अकादमीने ५.२ षटकांत एक बाद ४५ धावा करत विजय मिळवला. क्रिकेट नेक्स्ट अकादमीकडून जीत तेलीसारा आणि देवाशीश घोडके यांनी प्रत्येकी तीन तर अमोघ गायकवाड याने दोन गडी बाद केले. क्रिकेट नेक्स्ट अकादमीकडून साई चव्हाणने नाबाद १७ धावा करत संघाचा विजय साकारला. जीत तेलीसारा सामनावीर किताबाचा मानकरी ठरला.

दुसºया सामन्यात स्टार स्पोर्ट्स अकादमी अ संघाने २२ यार्ड्स संघावर ३५ धावांनी विजय मिळवला. स्टार स्पोर्टस अकादमीने २० षटकांत तीन बाद १३८ धावा केल्या. २२ यार्डस संघाला १७.२ षटकांत १०३ धावांवर रोखत स्टार स्पोर्टस अ संघाने विजय मिळवला. स्टार स्पोर्टकडून समर्थ पोकाळे (नाबाद ४०), सुयश मोरे (३६), रुपेश ठाकूर (३२) यांनी संघाला १३८ पर्यंत नेले. २२ यार्ड्सच्या नीलमेघ नागावकर याने सर्वाधिक ३५ धावा केल्या. स्टार स्पोर्ट्सकडून ऐश्वर्या काळे हिने पाच गडी बाद केले. ऐश्वर्या सामनावीर ठरली.

फोटो - जीत तेलीसारा, ऐश्वर्या काळे

---------------------------------------------------

Web Title: Cricket Next, Star Sports wins