क्रिकेट नेक्स्ट अकादमीची सहारावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:11 IST2021-03-27T04:11:27+5:302021-03-27T04:11:27+5:30

पुणे : शिवम होलेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर क्रिकेट नेक्स्ट अकादमीने १९ वर्षांखालील स्टार चषक क्रिकेट स्पर्धेत सहारा ...

Cricket Next Academy defeated Sahara | क्रिकेट नेक्स्ट अकादमीची सहारावर मात

क्रिकेट नेक्स्ट अकादमीची सहारावर मात

पुणे : शिवम होलेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर क्रिकेट नेक्स्ट अकादमीने १९ वर्षांखालील स्टार चषक क्रिकेट स्पर्धेत सहारा ११ संघावर दोन गडी राखून मात केली.

सहारा ११ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ४१.१ षटकांत सर्वबाद १९४ धावा केल्या. क्रिकेट नेक्स्ट अकादमीने ४४ षटकांत आठ बाद १९५ धावा करत विजय मिळवला. सहारा ११ कडून मित्रजित नाईक (३४), मानस कोंढारे (४३), रुद्राज घोसाले (२८) यांनी संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. क्रिकेट नेक्स्ट अकादमीकडून निमीर जोशी, शिवम होले यांनी प्रत्येकी तीन, नील गांधीने दोन गडी बाद केले.

क्रिकेट नेक्स्ट अकादमीकडून शिवम होले (४२), मानलीव घई (३३), नील गांधी (३१) यांनी संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. सहारा ११ कडून अजिंक्य तुळपुळेने तीन, जय पाटील आणि अखिलेश पंडित यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. शिवम होले सामनावीर ठरला.

फोटो - शिवम होले

Web Title: Cricket Next Academy defeated Sahara