क्रेडाई पुणे-मेट्रो यांच्यातर्फे आजपासून ‘घर खरेदी उत्सव’
By Admin | Updated: January 15, 2016 02:43 IST2016-01-15T02:43:24+5:302016-01-15T02:43:24+5:30
क्रेडाई पुणे - मेट्रोतर्फे ‘घर खरेदी उत्सवा’चे १५, १६ आणि १७ जानेवारी रोजी येथील एसएसपीएमएस मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे. या गृह प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी साडेदहा

क्रेडाई पुणे-मेट्रो यांच्यातर्फे आजपासून ‘घर खरेदी उत्सव’
पुणे : क्रेडाई पुणे - मेट्रोतर्फे ‘घर खरेदी उत्सवा’चे १५, १६ आणि १७ जानेवारी रोजी येथील एसएसपीएमएस मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे. या गृह प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच ग्राहकांना विस्तीर्ण पर्यायातून योग्य गुंतवणूक करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.
या प्रदर्शनात १२० हून अधिक डेव्हलपर्स, १००० हून अधिक प्रॉपर्टी प्रकल्प असतील. तसेच १० लाखांपासून पुढे प्रॉपर्टी प्रकल्पांचे सादरीकरण असणार आहे. देशातील अग्रेसर बँकांचादेखील या प्रदर्शनामध्ये महत्वपूर्ण सहभाग असेल. वास्तू घेण्यासाठी किंवा पैशांची गुंतवणूक करण्यासाठी ही मोठी संधी आहे. सदनिका, प्लॉट्स, शॉप्स, आॅफिसेस आणि बंगलोज अशा विस्तृत पर्यायांमधून ग्राहक आपल्यासाठी योग्य वास्तू निवडू शकणार आहेत.
पुणे हे दर्जेदार जीवनासाठी देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. देशातील १०० स्मार्ट सिटीमध्ये पुण्याचा समावेश करण्यात आला असल्याने, ही महत्वाची बाब लक्षात घेऊन क्रेडाई पुणे - मेट्रोने ‘क्रेडिबल’ घर खरेदी ही संकल्पना मांडली आहे.
क्रेडाई पुणे - मेट्रोची स्थापना १९८२ साली झाली. गेली ३३ वर्ष बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेने अनेक फायदेशीर बांधकामविषयक योजना यशस्वीरीत्या राबविल्या आहेत. तसेच, क्रेडाई पुणे - मेट्रो ग्राहकांच्या नेमक्या गरजा जाणून घेण्यात आघाडीवर राहिले आहे.