शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

क्रेडाई देणार पाणीबचतीचे धडे;  बांधकामासाठीचा पाणीवापर होणार कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 20:11 IST

बांधकाम होणार पाणीबचतपूरक

ठळक मुद्देप्रकल्पावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनादेखील दिले जाणार तांत्रिक प्रशिक्षण

पुणे : बांधकाम करताना पाण्याचा कमीत कमी वापर कसा होईल, तसेच प्रकल्पामधे रहिवासी आल्यानंतर ते पाण्याची बचत कशी करू शकतील, याबाबत क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे बांधकाम व्यावसायिकांना पाणीबचतीचे धडे देण्यात येणार आहेत. तसेच प्रकल्पावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनादेखील तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट यांनी दिली. क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे आयोजित पाणीबचतीवर आयोजित पहिल्या कार्यशाळेत ते बोलत होते. क्रेडाई पुणे मेट्रोचे सचिव आदित्य जावडेकर, महासंचालक डी. के. अभ्यंकर, सरव्यवस्थापिका ऊर्मिला जुल्का या वेळी उपस्थित होते. बांधकाम व्यावसायिक सर्वेश जावडेकर आणि चेन्नईतील पाणी व्यवस्थापन अभ्यासक अभिलाष हरिदास यांनी बांधकाम व्यावसायिकांना मार्गदर्शन केले.बांधकाम करताना दर्जा राखत पाण्याची बचत कशी करावी, भिंतींवर पाणी फवारण्यासाठी विद्युपत पंपाचा वापर न करता शेतात कीटकनाशक फवारणीसाठी वापरण्यात येणाºया पंपाचा वापर करावा, अशी सूचना जावडेकर यांनी केली. तसेच, बांधकामात ‘सेल्फ क्यूरिंग मोर्टार’सारखे आधुनिक साहित्य वापरावे. मानकानुसार शहरात प्रतिदिन दरडोई १३५ लिटर पाणीपुरवठ्याची गरज असते. काळजीपूर्वक वापर केल्यास दरडोई ९० लिटर पाणीदेखील पुरेसे ठरू शकते. स्वयंपाकघरातील नळ आणि शॉवरला गरजेपेक्षा अधिक पाणी न सोडणारे विशेष नळ बसवावेत, असेही जावडेकर म्हणाले. प्रत्येक घरी पाणी मीटर बसविले पाहिजे. त्यामुळे कोण किती पाणीवापर करते, याची माहिती गृहसंस्थेला उपलब्ध होईल. मीटरमुळे पाणीवापर ५० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो, असे पाहणीत स्पष्ट झाले आहे. त्याच जोडीला सोसायटीमधून निघणाºया खराब पाण्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणाही (एसटीपी) उभारली गेल्यास मोठ्या प्रमाणावर पाण्याचा पुनर्वापर आणि त्यामुळे पाणीबचत होऊ शकते, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले. साध्या पाणी मीटरमधील त्रुटी दूर करून पाणीवापरावर काटेकोर लक्ष ठेवणाºया ‘आयओटी बेस्ड वॉटर मीटर’ उपकरणाबद्दल हरिदास यांनी माहिती दिली. या प्रकारचे मीटर दक्षिण भारतातील अनेक शहरांत वापरले जात आहेत. त्यामुळे नागरिकांमधे पाणीबचतीबाबत जागरूकता वाढल्याचे दिसून आल्याचे हरिदास यांनी सांगितले.०००

टॅग्स :Puneपुणेbusinessव्यवसायWaterपाणी