लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : सध्या उन्हाळी सुट्या सुरू आहेत. या सुटीमध्ये क्रिकेटचा फीवर सर्वत्र जाणवत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी सृजन क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या संकल्पनेतून १२ मेपासून बारामती शहरातील रेल्वे मैदानावर ही स्पर्धा सुरू होत आहे.याबाबत जिल्हा परिषद सदस्य पवार यांनी अधिक माहिती दिली. या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व अधोरेखित करणार आहे. विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण दिले जावे, मुलांच्या गुणवत्तेसाठी या शाळा अधिक उपयुक्त आहेत. लवकरच डिजिटल शाळा म्हणून नावारूपाला येणार आहेत. यानिमित्ताने क्रिकेट फीवर अनुभवण्यासाठी येणाऱ्या युवकांपर्यंत पोहोचविली जाणार आहे. युवकांनादेखील त्यासाठी जोडले जाणार आहे. या स्पर्धेत ५० हजार रुपयांच्या पारितोषिकाव्यतिरिक्त गावाला उपयुक्त साधने बक्षिसाच्या स्वरूपात दिली जाणार आहेत.
बारामती शहरात सृजन क्रिकेट करंडक स्पर्धा
By admin | Updated: May 11, 2017 04:06 IST