क्राँक्रिटीकरण भोवणार

By Admin | Updated: May 22, 2014 05:59 IST2014-05-22T05:59:59+5:302014-05-22T05:59:59+5:30

महापालिका प्रशासनाकडून शहरातील रस्त्यांवर डांबरीकरणाचे थर जुने रस्ते न खोदताच टाकले असून, गल्लीबोळही सिमेंट रस्त्यांचे केले आहेत.

Crankitiveness fades | क्राँक्रिटीकरण भोवणार

क्राँक्रिटीकरण भोवणार

पुणे : महापालिका प्रशासनाकडून शहरातील रस्त्यांवर डांबरीकरणाचे थर जुने रस्ते न खोदताच टाकले असून, गल्लीबोळही सिमेंट रस्त्यांचे केले आहेत. त्यामुळे या रस्त्यांची उंची घरांच्या उंचीपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढली असून, पावसाळ्यात अनेक नागरिकांची घरे पाण्याखाली जाणार आहेत. महापालिकेच्या नियमांनुसार, रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरांचे जोते जमिनीच्या पातळीपासून ४५ सेंटिमीटर उंच असणे गरजेचे आहे. त्यानुसारच नागरिकांना घर बांधण्यासाठी परवानगी दिली जाते. मात्र, महापालिकेकडून नागरिकांना हा नियम लागू केला जात असला, तरी पालिकेकडून मात्र रस्त्यांची कामे करताना व नव्याने सिमेंटचे रस्ते तयार करताना याबाबत महापालिका प्रशासनाच नियम पाळत नाही. ज्या नागारिकांना रस्त्याच्या समस्या आहेत, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने स्वतंत्र कक्ष तयार करण्यात यावा, अशी मागणी मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली. तसेच, याबाबत तक्रारी असलेल्या नागरिकांनी मंचाशी संपर्क साधण्याचे आवाहनही वेलणकर यांनी केले आहे.

Web Title: Crankitiveness fades