क्रेनची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक; बालिका ठार
By Admin | Updated: January 12, 2015 23:11 IST2015-01-12T23:11:36+5:302015-01-12T23:11:36+5:30
येथे भरधाव क्रेनने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक बालिकेचा मृत्यू झाला

क्रेनची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक; बालिका ठार
न्हावरे : येथे भरधाव क्रेनने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक बालिकेचा मृत्यू झाला, तर या अपघातात १८ ऊसतोडणी कामगार जखमी झाले आहेत.
आज सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास शिरूर-सातारा रस्त्यावर न्हावरे ग्रामीण रुग्णालयाजवळ हा अपघात झाला. या अपघातात रूपाली महेंद्र सोनवणे (वय २ वर्षे) हिचा मृत्यू झाला. तसेच, सरलाबाई सोनवणे (वय १८), महेंद्र काकडे (वय १८ वर्षे), कलूबाई सोनवणे (वय ५५ वर्षे), कांतिलाल मोरे (वय ३५ वर्षे), दिलीप आदिवासी (वय ५५ वर्षे), रत्नाबाई मोरे (वय २५ वर्षे), आरती ठाकरे (वय १४ वर्षे), प्रमोद ठाकरे (वय २० वर्षे), सुनीता वाघ (वय ३० वर्षे), जयसिंग सोनवणे (वय ३२ वर्षे), गंगूबाई सोनवणे (वय ६० वर्षे), अरुण मारची (वय अडीच वर्षे), रत्नाबाई सोनवणे (वय २५ वर्षे), पावबा मोरे (वय ५ वर्षे), सुमन ठाकरे (वय ५५ वर्षे), देवा उसन (वय २ वर्षे), मीनाक्षी माळसे (वय ७ वर्षे), हे जखमी झाले आहेत.
सर्व ऊसतोडणी कामगार नंदुरबार जिल्ह्यातील सैतानपूर गावचे आहेत. सध्या ते न्हावरे परिसरातील गारगोटे वस्ती येथे राहत होते. हे सर्व जण गुऱ्हाळासाठी ऊसतोडणीचे काम करीत होते. सकाळी ते ऊसतोडणीच्या कामासाठी निघाले होते. (वार्ताहर)