अमृतांजन पुलाजवळ क्रेनची शिडी कारवर पडून एक ठार

By Admin | Updated: January 17, 2015 00:04 IST2015-01-17T00:04:30+5:302015-01-17T00:04:30+5:30

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाजवळ शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास मुंबईकडे जाणा-या एका क्रेनची शिडी घसरुन कारवर पडल्याने एक जण जागीच ठार झाला़

A crane ladder fell on the car near Amratanjan bridge and killed one | अमृतांजन पुलाजवळ क्रेनची शिडी कारवर पडून एक ठार

अमृतांजन पुलाजवळ क्रेनची शिडी कारवर पडून एक ठार

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाजवळ शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास मुंबईकडे जाणा-या एका क्रेनची शिडी घसरुन कारवर पडल्याने एक जण जागीच ठार झाला़ हा अपघात पाहण्यासाठी एका कार चालकाने गाडीचा ब्रेक मारल्याने सुमारे ७ ते ८ गाड्या एकमेकावर आदळून येथे विचित्र अपघात झाल्याने खंडाळा घाटात काही काळ वाहतुक विस्कळीत झाली होती़
पंधरवड्यापासून खंडाळ्यातील अमृतांजन पुलाजवळ दररोज अपघात व वाहतुक कोंडी होत असल्याने अमृतांजनची ही डोकेदुखी थांबणार तरी केव्हा? असा प्रश्न उपस्थित होत असून यावर महाराष्ट्र शासनाने तातडीने तोडगा काढावा अशी मागणी प्रवाश्यांनी केली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: A crane ladder fell on the car near Amratanjan bridge and killed one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.