ट्रेलरच्या धडकेत क्रेन क्लिनरचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:27 IST2020-12-14T04:27:55+5:302020-12-14T04:27:55+5:30
पुणे : ट्रेलरने क्रेनला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात क्रेनवरील क्लिनरचा मृत्यू झाला. ही घटना डेक्कन जिमखान्यावरील गरवारे पुलाजवळ ...

ट्रेलरच्या धडकेत क्रेन क्लिनरचा मृत्यू
पुणे : ट्रेलरने क्रेनला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात क्रेनवरील क्लिनरचा मृत्यू झाला. ही घटना डेक्कन जिमखान्यावरील गरवारे पुलाजवळ शनिवारी पहाटे घडली.
अरविंदकुमार लालबच्चन यादव (वय २०) असे मृत्यमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. क्रेनचालक राजकुमार यादव (वय ३२, रा. पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी ट्रेलरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कर्वे रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू आहे. मेट्रोचे काम आटोपून क्रेनचालक राजकुमार यादव आणि सहकारी क्लिनर अरविंदकुमार यादव पहाटे पाचच्या सुमारास खंडोजीबाबा चौकाकडून ज्ञानेश्वर पादुका चौकाकडे जात होते. गरवारे पूल उतरून क्रेन पुढे जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रेलरने क्रेनला धडक दिली. क्रेनचालक यादवला दिशा दाखविणारा क्लिनर यादव खाली पडला. यादवला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर ट्रेलरचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या क्लिनर यादवचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.