शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

पुणे शहरातील गुन्हेगार, संघटित गुन्हेगारांच्या टोळ्यांचा बिमोड करणार : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 12:03 IST

लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली बेरोजगारी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांना पॅरोल मिळाल्याने गुन्हेगारी वाढली.

ठळक मुद्देलोकमत कार्यालयाला भेट‘पॉस्को’चे गुन्हे अपर पोलीस आयुक्तांच्या निगराणीखालीगौतम पाषाणकर बेपत्ताचे गुढ उलघडणारगुन्हे शाखा अधिक बळकट करण्यावर भर

पुणे : महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना शहरात सुरक्षित वाटावे, असे वातावरण तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांकडे आम्ही अधिक गांभीर्याने पाहत आहोत. मात्र, लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली बेरोजगारी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांना पॅरोल मिळाल्याने शहरातील गुन्हेगारीमध्ये वाढ झालेली दिसून येते असे स्पष्ट मत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी नोंदवले. तसेच त्याविषयी पालकमंत्र्यांनी कोणतेही भाष्य केले नसल्याचे सांगितले.

पुणे पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गुप्ता यांनी शुक्रवारी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. संपादक प्रशांत दीक्षित आणि व्यवस्थापक मिलन दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले. 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, शहरात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित वाटावे, यासाठी बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी कराव्या लागणार आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरु आहे. त्याचे परिणाम काही दिवसात दिसून येऊ लागतील. अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या गुन्ह्यांकडे अधिक गांभीर्याने पोलीस पाहत आहेत. अशा गुन्ह्यामध्ये एफआयआर (प्राथमिक तक्रार) दाखल करतानाच तो अधिक काळजीपूर्वक दाखल करुन त्याचा तपास व्हावा, यासाठी अपर पोलीस आयुक्तांच्या देखरेखीखाली अशा गुन्ह्यांचा तपास होणार आहे.

गुप्ता म्हणाले, आमचे पहिले उद्दिष्ट बेसिक पोलिसिंगवर राहणार आहे. गुन्हेगारांचा छडा लावून त्यांना अटक करुन शिक्षा होईल, हे पाहिल्यास गुन्हेगारीवर नियंत्रण राहू शकते. त्यासाठी तंत्रज्ञानाचा भरपूर वापर करण्याकडे आपला भर असणार आहे. त्यादृष्टीने सर्व घटकांमध्ये एकसुत्रता आणण्याचा आपला प्रयत्न आहे़ ज्या ठिकाणी आवश्यक आहे, तेथे अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बळ पुरविण्यात येत आहे. अशाप्रकारे ९३ पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालयातून प्रत्यक्ष पोलीस ठाण्यांमध्ये आणण्यात आले आहे.पोलीस उपायुक्त, वरिष्ठ निरीक्षकांना अधिक स्वातंत्र्य देण्याबरोबरच जबाबदारी देण्यावर आपला भर आहे़ त्याशिवाय त्यांना ते काम आपले वाटणार नाही.  

लोकांना समाधान देण्यावर भरपोलीस ठाण्यात नागरिक त्यांची तक्रार घेऊन आल्यावर त्यांची तक्रार चांगल्या प्रकारे नोंदवून घेणे महत्वाचे आहे. लोकांना त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन कारवाई केली याचे समाधान द्या. याकडे माझा कटाक्ष राहणार आहे.

गुन्हे शाखा अधिक बळकट करण्यावर भरशहरातील गुन्हेगार, संघटित गुन्हेगारांच्या टोळ्या यांचा बिमोड करण्यासाठी गुन्हे शाखा अधिक बळकट करण्यात येत असून सोनसाखळी चोरी, वाहनचोरीसह इतर गंभीर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र पथके तयार केली आहेत. त्यांना दर आठवड्याला कामगिरीचा अहवाल द्यावा लागणार आहे.

गौतम पाषाणकर बेपत्ताचे गुढ उलघडणारगौतम पाषाणकर हे बेपत्ता झाले असून त्याविषयीचे काही धागेदोरे पोलिसांना मिळाले आहेत. येत्या ७ दिवसात त्यामागील गुढ उलघडले जाईल.़़़़़़़़़़...असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीपिंपरी चिंचवडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याला बोनेटवरुन फिरविल्याचा प्रकाराविषयी आयुक्त म्हणाले की, असे प्रकार पुण्यात खपवून घेणार नाही. पोलिसांविषयी आदर असलाच पाहिजे.गुन्हेगारांमध्ये पोलिसांविषयी भीती असलीच पाहिजे तसेच नागरिकांनाही पोलिसांबद्दल आदरपुर्वक भीती असायला आहे. पोलिसांविषयी नागरिकांना आत्मविश्वास वाढावा, यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे़

‘‘आदमी पोलीससे मिलता है , तब उसे लगता है इतना बुरा भी नही’’अशी भावना निर्माण होते. पोलिसांविषयी लोकांच्या मनातील प्रतिमेत सुधारणा करण्यासाठी तरुणाईशी संवाद साधण्यात येणार आहे.़़़़़़़़़़बेरोजगारी, पॅरोलवरील गुन्हेगारांमुळेच गुन्हेगारी वाढलीलॉकडाऊनमुळे निर्माण झालेली बेरोजगारी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांना पॅरोल मिळाल्याने शहरातील गुन्हेगारीमध्ये वाढ झालेली दिसून येते, असे मत आहे. त्याविषयी पालकमंत्रींनी कोणतेही मत नोंदविले नसल्याचे त्यांनी सांगितले. ़़़़़़़़़़लोणी काळभोर, लोणीकंद पोलीस ठाण्याचा समावेश पुणे शहर पोलीस आयुक्तालयात करण्यात आला आहे. त्याबाबतच्या काही अडचणी पालकमंत्र्यांशी बोलणार आहे़ हडपसर आणि चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत आणखी एक एक पोलीस ठाण्यांची निर्मिती आवश्यक आहे.त्याचा प्रस्ताव पाठविला आहे. ़़़़़कोविड १९ मध्ये राज्य शासनाच्या खर्चाला मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे अधिक मनुष्यबळ वाढवून मिळण्याला मर्यादा येणार आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानावर यापुढे अधिक भर दिला जाणार आहे. त्यासाठी पोलिसांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी पुण्यातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची मदत घेणार आहे. .....शहरातील आर्थिक व सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. त्यादृष्टी त्यातील कायद्यांची अधिक जाणकार पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेऊन त्यातून तेथील अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. आणखीही काही अधिकाऱ्यांची तेथे नेमणूक करण्यात येणार आहे.़़़़़़़़शहरातील वाहतूक सुधारणेसाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून स्मार्ट इटेलिजन्स सिस्टिम असा प्रस्ताव महापालिकेला सादर केला आहे सिग्नल सिक्रोनाईज करुन लोकांचा प्रवासातील वेळ कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल.वाहतूक शाखेला २०० जादा कर्मचारी देण्यात आले आहेत़ तसेच मेट्रोला त्यांच्या मार्गावर वॉडर्न नेमण्यास सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcommissionerआयुक्त