शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

गायीलाच दुधाने घातली अंघोळ, सर्वपक्षीय आंदोलनात उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:46 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दर आंदोलनाला प्रतिसाद देण्यासाठी इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे पदाधिकारी सरसावले आहेत.

भवानीनगर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दर आंदोलनाला प्रतिसाद देण्यासाठी इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे पदाधिकारी सरसावले आहेत. तालुक्यातील जाचकवस्ती येथे गायीलाच दुधाने आंघोळ घालुन सर्वपक्षीय कार्यकत्यांनी राज्य सरकारचा निषेध केला.भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे.शेतकऱ्यांना प्रतिलिटर सुमारे १० रुपये तोटा दूध धंद्यामध्ये सहन करावा लागत आहे. मात्र, याबाबत कोणी गंभीर नाही. वाढत्या तोट्यामुळे शेतकरी अडचणीत चालला आहे, असे मत यावेळी जाचकवस्तीचे माजी उपसरपंच विक्रमसिंह निंबाळकर यांनी मांडले. शेतकºयांच्या खात्यावर प्रतिलीटर ५ रुपये अनुदान जमा करण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्णय घेण्याचा इशारा यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केला.यावेळी संग्रामसिंह निंबाळकर, प्रकाश नेवसे, राहुल जगताप, सिद्धार्थ जाचक, अमरसिंह निंबाळकर, अमोल भोईटे आदींनी सहभाग घेतला.>बोबडेमळा येथे दूध दरवाढीसाठी आंदोलनसुपे : पानसरेवाडी (ता. बारामती) अंतर्गत असणाºया बोबडेमळा येथील शेतकºयांनी दूधदरवाढीसाठी तीव्र आंदोलन केले. राज्यशासनाने दुधाचे दर त्वरित वाढवावे, यासाठी बोबडेमळा येथील शेतकºयांनी आक्रमक होऊन दूध खाली ओतून दिले.येथील शेतकरी मागील दोन दिवसांपासून दूध आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. येथील शेतकºयांना पावसाअभावी जनावरांचा चारा विकत घ्यावा लागत आहे. चाºयाचा सध्या बाजारभाव २ हजार ५०० रुपयेप्रतिटन आहे.जनावरांच्या संगोपनासह सर्व हिशोब केला तर दररोज चार जनावरांच्या मागे ४०० रुपये तोटा सहन करावा लागत असल्याची माहिती तात्यासाहेब काळखैरे, लव्हाजी काळखैरे, नवनाथ काळखैरे, संतोष काळखैरे यांनी दिली. सरकारने आता तरी शेतकºयांचा अंत पाहू नये. दुधाला प्रतिलिटर २७ रुपये बाजारभाव द्यावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.>भिलारवाडीत शेतकºयांची दुधाने अंघोळकाºहाटी : भिलारवाडी येथे दुधाने अंघोळ करीत शेतकºयांनी दूधदरवाढ आंदोलनाला पाठिंबा दिला. शेतकºयाच्या दुधाला पाच रुपये अनुदान देण्याच्या मागणीला समर्थन म्हणून भिलारवाडी परिसरामध्ये दूध संकलन न करण्याचा निर्णय घेऊन आंदोलन करण्यात आले. बारामती तालुक्यातील भिलारवाडी जळगाव कडेपठार परिसरामध्ये शेतकºयांनी दूध संकलन केंद्रावर दूध न घालण्याचा निर्णय घेऊन आंदोलन सक्रिय केले आहे. जोपर्यंत शेतकºयांच्या खात्यावर अनुदान मिळत नाही तोपर्यंत दूध घालणार नाही, असा पवित्रा घेतल्यामुळे केंद्रावर संकलन झाले नाही. जिवापाड सांभाळलेली जनावरे शेतकºयांना जगवावी लागत आहेत. पाऊस नाही, पाणी नाही, जनावरांना चारा नाही आणि त्यातच दुधाला बाजारभाव नाही. जगायचं तर कसं जगायचं, आता नाही मग कधीच नाही, म्हणून आम्ही सगळे जण एकत्र येऊन दूध न घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे भिलारवाडीचे शेतकरी सुनील भिलारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.