आज कोविशिल्ड लस उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:11 IST2021-09-27T04:11:33+5:302021-09-27T04:11:33+5:30

पुणे : शासनाकडून नव्याने लस प्राप्त झाल्याने, आज (दि. २७) महापालिकेच्या १८७ केंद्रांवर प्रत्येकी २०० कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार ...

Covishield vaccine available today | आज कोविशिल्ड लस उपलब्ध

आज कोविशिल्ड लस उपलब्ध

पुणे : शासनाकडून नव्याने लस प्राप्त झाल्याने, आज (दि. २७) महापालिकेच्या १८७ केंद्रांवर प्रत्येकी २०० कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे. मात्र, आज कोव्हॅक्सिन लस मिळणार नाही.

उपलब्ध लसीच्या साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना १० टक्के लस ही ऑॅनलाईन बुकिंगद्वारे, तर १० टक्के लस ही ऑॅन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे. तर, लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ४० टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना (४ जुलैपूर्वी लस घेतलेल्यांना) ऑॅनलाईन बुकिंगद्वारे, तर ४० टक्के लस ही ऑॅन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे. लसीकरणाच्या ऑॅनलाईन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.

Web Title: Covishield vaccine available today