आज ६१ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:09 IST2021-06-24T04:09:43+5:302021-06-24T04:09:43+5:30

पुणे : शहरातील महापालिकेच्या ६१ केंद्रांवर आज (गुरुवार, दि.२४ जून) कोविशिल्ड, तर १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध राहणार ...

Covishield vaccine available today at 61 centers | आज ६१ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध

आज ६१ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध

पुणे : शहरातील महापालिकेच्या ६१ केंद्रांवर आज (गुरुवार, दि.२४ जून) कोविशिल्ड, तर १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध राहणार आहेत़

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे़ याव्दारे प्रत्येक केंद्रावर कोविशिल्ड लसीचा ७० टक्के ऑनलाईन नोंदणीचा कोटा निश्चित करण्यात आला आहे़ तर, ३० टक्के लस या ऑनस्पॉट नोंदणी करून मिळणार आहेत़

----

२६ मेपूर्वी डोस घेतलेल्याना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसही उपलब्ध

२६ मेपूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांना आज १५ केंद्रांवर दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे़ यातील ५० टक्के लस ही ऑनलाईन नोंदणी केलेल्यांना व ५० टक्के लस ही ऑन स्पॉट नोंदणी केलेल्यांना दिली जाणार आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस मात्र कोणालाही दिला जाणार नाही़

------------------------

४५ वर्षांवरील नागरिकांना ५ ठिकाणी लस

डीआरडीआे बावधान, पोलीस हॉस्पिटल स्वारगेट, ससून हॉस्पिटल पुणे स्टेशन, रेल्वे हॉस्पिटल पुणे स्टेशन व आय़आय़एस़ई़आर औंध-पाषाण येथे ४५ वर्षांवरील नागरिकांना ८० टक्के कोविशिल्ड लसीचा पहिला डोस उपलब्ध राहणार आहे़ तर २० टक्के लस ज्या नागरिकांनी १ एप्रिलपूर्वी पहिला डोस घेतला आहे, त्यांच्याकरिता याठिकाणी राखीव ठेवण्यात आली आहे़ ऑन स्पॉट नोंदणी करून येथे लस मिळणार असून, येथे प्रत्येकी १०० लसींचे डोस पुरविण्यात आले आहेत़

-------------------------------

Web Title: Covishield vaccine available today at 61 centers