आज १८७ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:11 IST2021-07-30T04:11:00+5:302021-07-30T04:11:00+5:30

पुणे : शहरातील महापालिकेच्या १८६ केंद्रांवर आज (शुक्रवार दि. ३० जुलै) कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे. लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी ...

Covishield vaccine available today at 187 centers | आज १८७ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध

आज १८७ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध

पुणे : शहरातील महापालिकेच्या १८६ केंद्रांवर आज (शुक्रवार दि. ३० जुलै) कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे. लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना २० टक्के लस ही ऑनलाईन बुकिंगद्वारे, तर २० टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे. याकरिता प्रत्येक केंद्रांवर लसीचे प्रत्येकी १०० डोस पाठविण्यात आले आहेत.

कोविशिल्ड लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ३० टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना (६ मे पूर्वी लस घेतलेल्यांना) ऑनलाईन बुकिंगद्वारे तर, ३० टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे.

महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे. तसेच सेशन संपण्यापूर्वी उघडलेल्या लसीच्या कुपीत लस शिल्लक राहिल्यास ऑन दी स्पॉट नोंदणी करून उपलब्ध लस दिव्यांग नागरिक व गरोगदर स्त्रिया यांना पहिला व दुसरा डोस म्हणून प्राधान्याने देण्यात येणार आहेत़

--------------------

सहा केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस

शहरातील ससून हॉस्पिटलसह महापालिकेच्या प्रत्येक झोननिहाय पाच ठिकाणी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध राहणार असून, ऑनलाईन बुकिंगद्वारे २० टक्के लस ही १८ वर्षांपुढील नागरिकांना व २० टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी केलेल्यांना पहिला डोस म्हणून दिली जाणार आहे.

Web Title: Covishield vaccine available today at 187 centers