आज ६० केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:12 IST2021-07-14T04:12:41+5:302021-07-14T04:12:41+5:30

पुणे : शहरातील महापालिकेच्या ६० केंद्रांवर बुधवारी (दि. १४) कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे़ लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी १८ वर्षांवरील ...

Covishield vaccine available at 60 centers today | आज ६० केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध

आज ६० केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध

पुणे : शहरातील महापालिकेच्या ६० केंद्रांवर बुधवारी (दि. १४) कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे़ लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना ४० टक्के लस ही आॅनलाइन बुकिंगद्वारे, तर २० टक्के लस ही आॅन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे़

कोविशिल्ड लसीच्या उर्वरित साठ्यापैकी २० टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना (२० एप्रिलपूर्वी लस घेतलेल्यांना) आॅनलाईन बुकिंगद्वारे तर २० टक्के लस ही आॅन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे़

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी सकाळी ८ वाजता आॅनलाईन स्लॉट ओपन होणार आहे. तसेच सेशन संपण्यापूर्वी उघडलेल्या लसीच्या कुपीत लस शिल्लक राहिल्यास आॅन स्पॉट नोंदणी करून उपलब्ध लस नागरिकांना देण्यात यावी, अशा सूचना प्रत्येक लसीकरण केंद्रास देण्यात आल्या आहेत़

--------------------

सहा केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस

शहरातील ससून हॉस्पिटलसह महापालिकेच्या प्रत्येक झोननिहाय पाच ठिकाणी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध राहणार असून, आॅनलाईन बुकिंगद्वारे २० टक्के लस ही १८ वर्षांपुढील नागरिकांना व २० टक्के लस ही आॅन दी स्पॉट नोंदणी केलेल्यांना दिली जाणार आहे़ तर ६० टक्के लस ही १५ जूनपूर्वी व २८ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना दिली जाणार आहे़ यामध्येही ४० टक्के लस ही आॅनलाईन बुकिंगद्वारे व २० टक्के लस ही आॅन दी स्पॉट नोंदणीद्वारे दिली जाणार आहे़

----------------------------------

Web Title: Covishield vaccine available at 60 centers today