आज १८२ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:10 IST2021-06-25T04:10:05+5:302021-06-25T04:10:05+5:30

पुणे : शहरातील महापालिकेच्या १८२ केंद्रांवर शुक्रवारी (दि. २५) कोविशिल्ड, तर १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध राहणार आहेत़ ...

Covishield vaccine is available at 182 centers today | आज १८२ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध

आज १८२ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध

पुणे : शहरातील महापालिकेच्या १८२ केंद्रांवर शुक्रवारी (दि. २५) कोविशिल्ड, तर १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध राहणार आहेत़

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे़ याव्दारे प्रत्येक केंद्रावर कोविशिल्ड लसीचा ७० टक्के ऑनलाईन नोंदणीचा कोटा निश्चित करण्यात आला आहे़, तर ३० टक्के लस या ऑन द स्पॉट नोंदणी करून मिळणार आहेत़

----

२७ मे पूर्वी डोस घेतलेल्यांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसही उपलब्ध

२७ मे पूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांना आज १५ केंद्रांवर दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे़ यातील ५० टक्के लस ही ऑनलाईन नोंदणी केलेल्यांना व ५० टक्के लस ही ऑन द स्पॉट नोंदणी केलेल्यांना दिली जाणार आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस मात्र कोणालाही दिला जाणार नाही़

------------------------

४५ वर्षांवरील नागरिकांना एकाच ठिकाणी लस

४५ वर्षांवरील नागरिकांना आज नगररोड येथील जगद्गुरू इंटरनॅशनल स्कूल साठेवाडी येथे कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे़ तर येथे २० टक्के लस ज्या नागरिकांनी २ एप्रिलपूर्वी पहिला डोस घेतला आहे, त्यांच्याकरिता राखीव ठेवण्यात आली आहे़

-------------------------------

Web Title: Covishield vaccine is available at 182 centers today