५४ केंद्रांवर कोविशिल्ड, तर १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:12 IST2021-05-27T04:12:25+5:302021-05-27T04:12:25+5:30

पुणे : शहरात गुरुवारी महापालिकेच्या ५४ केंद्रांवर कोविशिल्ड, तर १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध राहणार असून या सर्व ...

Covishield at 54 centers, Covacin at 15 centers | ५४ केंद्रांवर कोविशिल्ड, तर १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन

५४ केंद्रांवर कोविशिल्ड, तर १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन

पुणे : शहरात गुरुवारी महापालिकेच्या ५४ केंद्रांवर कोविशिल्ड, तर १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध राहणार असून या सर्व ठिकाणी लसीचे प्रत्येकी १०० डोस पुरविण्यात आले आहेत. ऑनलाईन स्लॉट बुकिंग करण्यासाठी आज (गुरुवारी) सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार: उपलब्ध लसीच्या साठ्यापैकी ६० टक्के लस ही ऑनलाईन बुकिंग करून अपॉईन्मेंट घेतलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस म्हणून दिली जाणार आहे. तर, २० टक्के लस ही ४५ वर्षे वयावरील नागरिकांना लसीकरण केंद्रावर ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून दिली जाणार आहे.

तसेच, २० टक्के लस ही ४५ वर्षांवरील नागरिकांना ज्यांनी ८४ दिवसांपूर्वी (२ मार्च पूर्वी) पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस म्हणून देण्यात येणार आहे.

------------------

कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसही उपलब्ध

ज्या नागरिकांनी २९ एप्रिलपूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांना आज १५ केंद्रांवर दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस मात्र कोणालाही दिला जाणार नाही.

------------------------

Web Title: Covishield at 54 centers, Covacin at 15 centers