पुरंदरच्या स्पर्धा परीक्षार्थींना कोविड लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:14 IST2021-08-18T04:14:54+5:302021-08-18T04:14:54+5:30

यावेळी जगताप यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँकिंग परीक्षा, पोलीस, संंरक्षण विभाग आदी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत संवाद ...

Covid vaccination to Purandar competition examinees | पुरंदरच्या स्पर्धा परीक्षार्थींना कोविड लसीकरण

पुरंदरच्या स्पर्धा परीक्षार्थींना कोविड लसीकरण

यावेळी जगताप यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँकिंग परीक्षा, पोलीस, संंरक्षण विभाग आदी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक सर्व बाबींची मदत केली जाईल, विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष देऊन चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन शासकीय विभागातून देशाची आणि सर्वसामान्य जनतेची उत्तम सेवा करावी, असे आ. संजय जगताप यांनी सांगितले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस गणेश जगताप, तालुका युवक अध्यक्ष माऊली यादव, सासवड शहर विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष विवेक जगताप, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सागर मोकाशी, ताालुका उपाध्यक्ष दीपक कळसकर, अप्पा भांडवलकर, ओमकार निगडे, आदित्य जगताप यांसह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सासवड येथे संजय जगताप यांनी लसीकरण केंद्रावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Web Title: Covid vaccination to Purandar competition examinees