पूर्व हवेलीतील कोरोना रुग्णासाठी कदमवाकवस्तीत कोविड सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:10 IST2021-04-11T04:10:23+5:302021-04-11T04:10:23+5:30
यावेळी उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार विजयकुमार चोबे, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, तालुका आरोग्य अधिकारी सचिन खरात, वैद्यकीय अधिकारी ...

पूर्व हवेलीतील कोरोना रुग्णासाठी कदमवाकवस्तीत कोविड सेंटर सुरू
यावेळी उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार विजयकुमार चोबे, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, तालुका आरोग्य अधिकारी सचिन खरात, वैद्यकीय अधिकारी दगडु जाधव, जिल्हा परिषद सदस्या अर्चना कामठे, पंचायत समिती सदस्य अनिल टिळेकर, माजी उपसभापती युगंधर काळभोर, माजी सरपंच नंदकुमार काळभोर, अर्जुन कांचन, प्रीतम काळभोर, पांडा काळभोर, रमेश मेमाणे आदी उपस्थित होते. कोविड सेंटर तत्काळ सुरू करण्यासाठी शासनाच्यावतीने उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी मदत केली.
पवार म्हणाले की, येथील कोविड सेंटर हे सव्वाशे बेड क्षमतेचे आहे. येथील रुग्णांना चांगल्या सुविधा पुरविण्यात येणार आहे. तर वैद्यकीय उपचारावर लक्ष दिले जाणार आहे. येथील रुग्णांना दोन वेळचे जेवण, एक वेळ नाष्टा, केळी, अंडी असा सकस आहार विनामूल्य शासनाच्या वतीने दिला जाणार आहे. रुग्णांना औषधाची कमतरता भासू देणार नाही.
सध्या गंभीर रुग्णांना ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याने जिल्हाअधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांच्याशी चर्चा करून हवेली तालुक्यात मुबलक साठा पुरविण्यासाठी बोलणी झाली आहे. त्याशिवाय थेट रुग्णांना इंजेक्शनचा पुरवठा सुरू करण्यासाठी आरोग्य मंत्री व जिल्हाअधिकारी यांच्याशी चर्चा केली असून तत्काळ पुरवठा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
-अशोक पवार, आमदार
--
फोटो क्रमांक: १० कदमवाकवस्ती कोविड सेंटर सुरू
फोटो ओळ-कोविड सेंटरचे उद्घाटन करताना आमदार अशोक पवार व जिल्हा परिषद सदस्या अर्चना कामठे व इतर.