शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुणे तिथे काय उणे! अखेर जिल्ह्यातील शंभर टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 19:43 IST

जिल्ह्यात शंभर टक्के लोकांचा पहिल डोस पूर्ण करणे आणि सर्व पात्र लोकांना दुसरा डोस देण्यासाठी हर घर दस्तक मोहिमेचा फायदा झाला...

पुणे: शासनाकडून मुबलक प्रमाणात लसीचे डोस उपलब्ध करून दिले जात असताना ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग कमी असल्याने जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नोव्हेंबर अखेरपर्यंत शंभर टक्के लोकांचा पहिला डोस पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. यासाठी हर घर दस्तक मोहिमे अंतर्गत घरोघरी जाऊन लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. यामुळेच बुधवार (दि.8) रोजी दुपारी जिल्ह्यातील शंभर टक्के 83 लाख 44 हजार 544 लोकांचा पहिला डोस पूर्ण झाला. तर 54 लाख 82 हजार (65.7%)  लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

राज्यासह जिल्ह्यात जानेवारी 2021 महिन्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. पण सुरूवातीचे सहा महिने लसीकरणाचा वेग खूपच कमी होता. परंतु जुलै- ऑगस्ट पासून केंद्र शासनाने पुरेशा प्रमाणात लसीचे उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. यामुळेच जिल्ह्यात ख-या अर्थाने ऑगस्ट नंतरच लसीकरण मोहिमेला वेग आला.

शासनासोबतच खाजगी रुग्णालये आणि अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन लसीकरणासाठी पुढाकार घेतला. तर जिल्हा प्रशासनाने विशेष तयारी करून दिवसाला तब्बल एक-दीड लाख लोकांचे लसीकरण पूर्ण होईल असे नियोजन केले.  "मिशन कवच कुंडल " अभियानांतर्गत तर दिवस रात्र व सुट्टीच्या दिवशी स्वतंत्र विकेंड लसीकरण मोहिम राबविण्यात आली.

जिल्ह्यात अनेक आमदार- खासदार व लोकप्रतिनिधींने देखील पुढाकार होत आपल्या मतदारसंघात विशेष लसीकरण मोहिम राबविल्या. तरी देखील 15 नोव्हेंबर पर्यंत केवळ 95 टक्के लोकांचा पहिला डोस झाला होता. यामुळेच जिल्हाधिकारी देशमुख यांनी नोव्हेंबर अखेर पर्यंत शंभर टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ग्रामीण भागातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामाला लागली व 8 डिसेंबर रोजी जिल्ह्यात शंभर टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. 

हर घर दस्तक मोहिमेमुळे उद्दिष्ट पूर्ण जिल्ह्यात शंभर टक्के लोकांचा पहिल डोस पूर्ण करणे आणि सर्व पात्र लोकांना दुसरा डोस देण्यासाठी हर घर दस्तक मोहिमेचा फायदा झाला. आरोग्य विभागाबरोबरच अंगणवाडी, शालेय शिक्षण व ग्रामपंचायत विभागाच्या कर्मचा-यांनी घरोघरी जाऊन  गृहभेटी देवून लसीकरणातून सुटलेले पात्र लाभार्थी यादी तयार करून जवळच्या लसीकरण केंद्रात लसीकरण करून घेतले. यामुळेच शंभर टक्के नागरिकांना पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करता आले.- आयुष प्रसाद,  मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या