शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

लवासाच्या लिलाव प्रक्रियेला स्थगिती देण्यास काेर्टाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 06:08 IST

Lavasa News : पर्यावरण नियमांचे उल्लंघन, बेकायदेशीर बांधकाम व आता आर्थिक डबघाईला आलेल्या लवासा प्रकल्प लिलाव प्रक्रियेस अंतरिम स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला.

 मुंबई : पर्यावरण नियमांचे उल्लंघन, बेकायदेशीर बांधकाम व आता आर्थिक डबघाईला आलेल्या लवासा प्रकल्प लिलाव प्रक्रियेस अंतरिम स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. मात्र, लिलाव प्रक्रिया व अन्य व्यवहार हे सर्व न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन असतील, असे या वेळी न्यायालयाने स्पष्ट केले.पुण्यात हिल स्टेशनवर उभारलेला लवासा प्रकल्प अनेक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे चर्चेत राहिला. या प्रकल्पासाठी शेत जमिनी जबरदस्तीने बळकावल्या. राष्ट्रवादीचे शरद पवार  यांच्या कुटुंबीयांचे हितसंबंध होते व  खासदार सुप्रिया सुळे यांच्या कंपनीने प्रकल्पात आर्थिक गुंतवणूक केली होती. त्यामुळे या प्रकल्पाला भूखंड मिळवून देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती केली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्या वेळी जलसंपदामंत्री होते. त्यांनी पदाचा गैरवापर करून पर्यावरण नियम व अन्य नियम धाब्यावर बसवून या प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यामुळे प्रकल्प बेकायदा ठरवून रद्द करा, अशी याचिका वकील नानासाहेब वसंतराव जाधव यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. सुनावणी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. प्रकल्प लिलावामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे लिलावास स्थगिती द्या, अशी मागणी याचिकेत आहे. मात्र, महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी याचिकाकर्त्याला एवढी घाई का आहे, असा सवाल केला. वित्तसंस्थांचे साडेपाच हजार कोटी देणेन्यायालयानेही याचिकेवर अंतिम सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली. परंतु, त्यापूर्वी लिलाव झाला तर सर्व प्रक्रिया, अन्य व्यवहार न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन राहतील, असे स्पष्ट केले. दरम्यान, लवासा कॉर्पोरेशनला विविध वित्तसंस्थांचे सुमारे साडेपाच हजार कोटी देणे आहे. लवासात मालमत्ता खरेदी केलेल्यांचे चारशे कोटी रुपयांचे देणे आहे. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालय