शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

हातगाडी विक्रेत्यांशी सौजन्याने वागावे : गिरीश बापट; रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांसाठी कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 14:36 IST

हातगाडी विक्रेत्यांना मित्रत्वाच्या व मार्गदर्शकाच्या नात्याने सांगितल्यास त्यांच्याकडूनदेखील सहकार्य मिळते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या विक्रेत्यांशी सौजन्याने वागावे, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिल्या.

ठळक मुद्देबापट यांच्या हस्ते झाले ‘क्लासरूम आॅन व्हील’ या बसचे उद्घाटन १५ जानेवारीपर्यंत शहरातील ४७ ठिकाणी फिरत्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना दिले जाणार प्रशिक्षण

पुणे : रस्त्यावरील अन्न पदार्थ खाणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रस्त्यावर अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी राज्याच्या अन्न औषध प्रशासन विभागातर्फे सुरू करण्यात आलेला उपक्रम स्तुत्य आहे. हातगाडी विक्रेत्यांना मित्रत्वाच्या व मार्गदर्शकाच्या नात्याने सांगितल्यास त्यांच्याकडूनदेखील सहकार्य मिळते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या विक्रेत्यांशी सौजन्याने वागावे, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिल्या.पुणे विभागीय अन्न व औषध प्रशासन व एका खासगी कंपनीच्या सहकार्याने टिळक वाडा येथे रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांसाठी आयोजित कार्यशाळेत बापट बोलत होते. कार्यशाळेत विक्रेत्यांना प्रशिक्षित करणाऱ्या ‘क्लासरूम आॅन व्हील’ या बसचे उद्घाटन बापट यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, प्रभाग समितीचे अध्यक्ष राजेश येनपुरे, नगरसेवक महेश लडकत, अन्न औषध विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई आदी उपस्थित होते.बापट म्हणाले, पुण्यात शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात. विद्यार्थ्यांसह इतरांना सुरक्षित अन्न मिळते का? हे पाहण्याची जबाबदारी अन्न व औषध विभागाची आहे. त्यासाठी प्रशासनाने त्यांना योग्य मार्गदर्शक केले पाहिजे.दरम्यान, ‘क्लासरूम आॅन व्हील’ या बसमधून येत्या १५ जानेवारीपर्यंत शहरातील ४७ ठिकाणी फिरत्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी जावून प्रशिक्षण दिले जाणार आहे.

टॅग्स :girish bapatगिरीष बापटBaba Adhavबाबा आढावPuneपुणे