शहरं
Join us  
Trending Stories
1
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
2
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
3
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
4
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
5
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
6
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
7
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
8
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
9
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
10
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
12
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
13
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
14
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
15
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
16
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
17
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
18
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
19
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
20
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट

धाडस हेच आपले मुख्य भांडवल : चेतना सिन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 12:42 IST

ग्रामीण भागातील महिलांना योग्य ते मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाची गरज आहे. ते मिळाल्यास ते त्यांची गुणवत्ता सिद्ध करतील.

ठळक मुद्देमहिला नवउद्योजकांना सल्ला : ‘फिक्की फ्लो बझार’चे उद्घाटन, ‘लोकमत’चे सहकार्य

पुणे :  पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढून प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या महिलांनी आता उद्योगक्षेत्रातदेखील गौरवास्पद कामगिरी केली आहे. मात्र वर्षानुवर्षे चालत असलेल्या रूढी-परंपरेच्या ओझ्यामुळे त्यांच्यातील उद्योगातील नेतृत्व समोर येण्यास वेळ लागत आहे. आपले धाडस हेच आपले भांडवल आहे. हा मंत्र त्यांनी आपले नवे नेतृत्व निर्माण करण्याकरिता लक्षात ठेवला पाहिजे, असा सल्ला माणदेश या दुष्काळी भागातील स्त्रियांकरिता काम करणाऱ्या समाजसेविका चेतना सिन्हा यांनी दिला.  लोकमत, एफएलओ पुणे यांच्या सहकार्याने फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की)तर्फे आयोजित ‘फिक्की फ्लो बझार’ प्रदर्शनाचे आयोजन सिन्हा यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या.  फिक्की फ्लो पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा रितू छाब्रिया, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, यूएसके फाउंडेशनच्या प्रमुख उषा काकडे, नगरसेवक आबा बागुल, ‘लोकमत’चे संपादक प्रशांत दीक्षित आदी उपस्थित होते. सिन्हा म्हणाल्या, ग्रामीण भागातील महिलांना योग्य ते मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाची गरज आहे. ते मिळाल्यास ते त्यांची गुणवत्ता सिद्ध करतील. माण तालुका पाण्याचे दुर्भिक्ष असलेला तालुका असून, अशा वेळी तेथील महिलांना कौटुंबिक जबाबदारी स्वीकारावी लागते. माणदेशी फाउंडेशनच्या निमित्ताने त्यांच्याकरिता काम करताना महिला सक्षमीकरणाच्याबाबत अनेक गोष्टींची माहिती झाली. धाडस अंगी बाणवल्याशिवाय त्यांना तरणोपाय नाही. सर्वसामान्य स्त्रीची दखल तेव्हाच घेतली जाईल ज्यावेळी ती धाडस दाखवून उद्योजकाच्या क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करेल. त्याकरिता समाजातील विविध स्तरांतून तिला सन्मानाची वागणूक मिळायला हवी. बागुल म्हणाले, महिला उद्योजकांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे आवश्यक आहे. एकूणच तरुण पिढीने व्यवसायात उतरण्याची गरज निर्माण झाली आहे. रितू छाब्रिया यांनी प्रास्ताविक केले. सोनिया राव यांनी सूत्रसंचालन केले. .........लोकमत आणि वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाकरिता या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचा प्रदर्शनात समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी महिलांच्या मूलभूत प्रश्नांवर उत्तरे शोधून त्यांना जगण्याचे बळ देणाºया सामाजिक कार्यकर्त्या चेतना सिन्हा यांची उपस्थिती प्रदर्शनाचे महत्त्व अधोरेखित करते. याचा विशेष आनंद वाटतो.  - रितू छाब्रिया, अध्यक्ष, फिक्की फ्लो, पुणे चॅप्टर.........हे प्रदर्शन मंगळवारी (दि. १२) सकाळी १0.३0 ते सायंकाळी ७.३0 पर्यत शेरेटॉन ग्रँड, राजा बहादुर मिल रस्ता, संगमवाडी येथे सुरू राहणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेLokmat Eventलोकमत इव्हेंटRaksha Bandhanरक्षाबंधन