शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय रेल्वेच्या स्टेशन मास्तरांचे ११ आॅगस्टला देशव्यापी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 20:04 IST

भारतीय रेल्वे सेवेत स्टेशन मास्तर हा एक महत्वाचा अविभाज्य भाग आहे. एआयएसएमए ही संघटना स्टेशन मास्तरांसाठी काम करते.

ठळक मुद्देउपोषणात देशातील ३५ हजार स्टेशन मास्तर सहभागी होणार अत्यंत महत्वाच्या पदावर काम करुन देखील प्रशासनाकडून स्टेशन मास्टर कैडरला नेहमीच दुर्लक्षित

पुणे : आॅल इंडिया स्टेशन मास्टर्स असोशिएशनच्या स्टेशन मास्टरांच्या संघटनेने ११ आॅगस्ट रोजी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संपूर्ण देशभर एकदिवसीय उपोषणाचा इशारा दिला आहे. उपोषण करुन प्रशासनाचा निषेध करणार असल्याची माहिती असोशिएशनचे सेक्रेटरी एस ए इनामदार यांनी दिली. देशातील ३५ हजार स्टेशन मास्तर  उपोषणात सहभागी होणार आहेत. रेल्वेच्या कुठल्याही कामाला अडथळा न होता हे उपोषण प्रभावीरित्या पार पाडण्यात येणार आहे. स्टेशन मास्तर हा भारतीय रेल्वेचा कणा असून त्याला रेल्वेचा ब्रँड अम्बेसिडर असे समजले जाते.रेल्वेच्या वाहतुकीत तथा सर्व विभागात काम करणा-यांचा तो दुवा असतो. अत्यंत महत्वाच्या पदावर काम करुन देखील प्रशासनाकडून स्टेशन मास्टर कैडरला नेहमीच दुर्लक्षित ठेवले जात असून संघटनेच्या मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. एम.ए.सी.पी. व्दारा मिळणारी बढती (ग्रेड पे ५४००) स्टेशन मास्तरांना देण्यात यावी, संपूर्ण देशभरात अनेक ठिकाणी स्टेशन मास्तरांना १२ तास ड्युटी करावी लागते. असे अमानवीय रोस्टर रद्द करण्यात यावे, ज्या पासून गाडी संचालनामध्ये धोका निर्माण होऊ शकतो. ड्युटी समाप्त झालेल्या स्टेशन मास्तरांसाठी (ज्यांना घरी जाण्यासाठी सुविधा नाही) त्यांना स्टेशनवर निवासाची व्यवस्था करुन देण्यात यावी, प्रशासनाने तयार केलेले स्टेशन डायरेक्टर हे पद अनुभवी व वरिष्ठ स्टेशन मास्तरांना देण्यात यावे. नवीन पेंशन योजनेला होणारा विरोध पाहता ती तातडीने रद्द करुन जुनी पेन्शन योजना पुन्हा लागु करावी आदी मागण्या असोशिएशनच्या वतीने करण्यात आल्या आहेत.  भारतीय रेल्वे सेवेत स्टेशन मास्तर हा एक महत्वाचा अविभाज्य भाग आहे. यांची संघटना (एआयएसएमए) ही स्टेशन मास्तरांसाठी सतत देशासाठी सेवा करण्याच्या उद्देशाने काम करते. देशभरातील उपोषणाचा कार्यक्रम प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता करण्यात आल्याचे असोशिएशनच्यातर्फे सांगण्यात आले. 

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वे