शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सेवाभावी संस्था, व्यक्तींमुळे देश होईल समर्थ; समर्थ पुरस्कार कार्यक्रमात श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 16:09 IST

स्नेहवन संस्थेचे संचालक अशोक देशमाने यांना सिंबायोसिस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते समर्थ गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुणे : समाजातील संस्कृती आणि माणूसकी नाहीशी होत आहे. असा वेळी तिला वाचविण्यासाठी आपणास सर्व समाजाने करूणावादी, अहिंसावादी, मानवतावादी, समाजवादी मूल्ये आत्मसात करून ती आचरणात आणणे गरजेचे आहे. मानवता दु:खमुक्त करण्यासाठी सेवाभावी संस्था व व्यक्ती निर्माण झाल्या तर राज्य, देश समर्थ होईल, असे प्रतिपादन माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. समर्थ प्रतिष्ठानच्या १८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सबनीस बोलत होते. या कार्यक्रमात स्नेहवन संस्थेचे संचालक अशोक देशमाने यांना सिंबायोसिस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते समर्थ गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी महापौर मुक्ता टिळक, भोई प्रतिष्ठानचे डॉ. मिलिंद भोई, ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, रंगत संगत प्रतिष्ठानचे अ‍ॅड. प्रमोद आडकर, अ‍ॅड. प्रताप परदेशी आदी उपस्थित होते. डॉ. भोई यांनी स्नेहवन संस्थेतील मुलांचे वैद्यकीय पालकत्व घेण्याचे जाहीर केले. अ‍ॅड. अडकर यांनी संस्थेस आर्थिक मदत जाहीर केली. डॉ. सबनीस म्हणाले, ‘आज तरूण मंडळी नोकरी आणि छोकरीमध्ये गुंतलेली आहे. अशावेळी या मंडळींना समाजकार्यात आणणे गरजेचे आहे. ढोल फक्त वाजवून काम होत नाही, या कलेचा वापर समाजकार्यात योगदान देण्यासाठी कार्य करावे लागते. गरजूंना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.’डॉ. मुजुमदार म्हणाले, ‘शिक्षणामुळे समाजाची आणि कुटुंबाची उन्नती होते. शिक्षण हा विकासाचा पाया आहे. सर्वांचा विकास करण्यासाठी शिक्षण हाच मार्ग आहे. त्यामुळे सबका विकास करण्यासाठी गुणवत्तापुर्ण शिक्षणाची गरज आहे. पुणे हे शिक्षणाबरोबरच सामाजिक संस्थांचेही केंद्र आहे.’     

टॅग्स :PuneपुणेShripal Sabnisश्रीपाल सबनीस