पीडितांना मानसिक आधारासोबत समुपदेशन महत्त्वाचे : दिलीप पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:11 IST2021-03-09T04:11:57+5:302021-03-09T04:11:57+5:30
जंक्शन (ता. इंदापूर) येथे जागतिक महिला दिनानिमित दक्षता समितीच्या आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पोलिस ठाण्यात ...

पीडितांना मानसिक आधारासोबत समुपदेशन महत्त्वाचे : दिलीप पवार
जंक्शन (ता. इंदापूर) येथे जागतिक महिला दिनानिमित दक्षता समितीच्या आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पोलिस ठाण्यात येणारी मुलगी, महिलांना आधार मिळावा, झालेला अन्याय कोणतीही भीती, संकोच न बाळगता सांगण्यासाठी पोलिस ठाण्यामध्ये त्यांच्या मदतीसाठी महिला दक्षता समिती कार्यान्वित झालेली आहे. समितीच्या बैठकाही घेतल्या जातात. पीडित महिलेसोबत पोलिसांसमोर कोणी महिला सदस्या तिच्यासोबत उभी राहिली तर संवाद साधणे सोपे होते. यामध्ये महिला सदस्यांना कायद्यांची ओळख असल्याने पीडितेला न्याय देण्याची भूमिका पार पाडली जाते. या समितीच्या माध्यमातून संघर्षग्रस्त महिलांना कायदेविषयक सहायता मिळवून देण्याकरिता पोलिसांच्या मध्यस्थीने पूर्ण सहकार्य या ठिकाणी करण्यात येते. या समितीमध्ये महिला वकील, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्त्या इत्यादीचा समावेश करण्यात आला आहे. समितीमध्ये अॅड मनीषा सांगळे (अध्यक्षा), सदस्य राज्यश्री मेरगळ, नंदा हगारे, दीपाली बोराटे, प्रियंका बनकर, प्रणिता बनसोडे, राज्यश्री खाडे, सुवर्णा निंबाळकर, मंजूषा कुलकर्णी यांचा समावेश आहे.
चौकट
पीडित महिलांना न्याय व आधार देऊन समुपदेशन केले जाते. त्यांना कायदेविषयक साहाय्यता केली जाते. पोलीस स्टेशनच्या माध्यमातून अनेक घरगुती हिंसाचार वाद मिटवले गेले आहेत.
-
अॅड. मनीषा सांगळे, अध्यक्षा, महिला दक्षता समिती