शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पोहण्याची स्टंटबाजी करण्याची हौस पडली महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 21:52 IST

पोहण्याची स्टंटबाजी करुन पाच तरुणांनी स्वत:चा जीव धोक्यात घालण्याची घटना जयंतराव टिळक पूलावर घडली.

ठळक मुद्देजयंतराव टिळक पूलावरुन पाच जणांच्या उड्या : एक जण अद्याप बेपत्ता

पुणे : पोहण्याची स्टंटबाजी करुन पाच तरुणांनी स्वत:चा जीव धोक्यात घालण्याची घटना जयंतराव टिळक पूलावर घडली. या पूलावरुन मुठा नदीत पाच तरुणांनी उड्या घेतल्या. मात्र त्यापैकी चार जण पाण्याबाहेर आले असून अद्याप एकाचा शोध सुरु आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्याचे काम अग्निशामक दलाने केले. त्यानंतर त्यांना प्रत्येक एक तासाला परिसरात बेपत्ता तरुणाचा शोध घेण्याची सूचना अग्निशामक दलाला देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षी देखील या तरुणांनी अशाच प्रकारची स्टंटबाजी करुन आपला जीव धोक्यात घातला होता. मुठा नदीत उडी मारलेल्या पाच मित्रांपैकी निखिल गौतम थोरात (वय २०, रा. कामगार पुतळा, शिवाजीनगर) हा युवक बेपत्ता झाला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोेंद केली असून युवकाचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल व त्याचे इतर चार मित्र दुपारी अडीचच्या सुमारास मुठा नदीत पोहण्यासाठी महापालिकेसमोरील जयंतराव टिळक पुलावर आले होते. पाचही मित्रांनी पुलावरून नदीत उडी  मारली. त्यातून चौघे जण बाहेर आले. मात्र निखिल बाहेर आलाच नाही. गेल्या काही दिवसांपासून जोरदार झालेल्या पावसाने धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले आहे. भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.  यामुळे  मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे. सोडलेल्या पाण्याचा वेग प्रचंड आहे. ााण्याचा वेग मोठ्या प्रमाणात आहे. उडी मारल्यानंतर पोहत पोहून चौघे मित्र बाहेर आले; मात्र बराच वेळ निखिल बाहेर आला नाही. तो दिसत नसल्याने मित्र घाबरले. हा परिसर गजबजलेला असल्याने नागरिकांनाही हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ अग्ग्निशामक दल व पोलिसांना या घटनेची माहिती दिली. शिवाजीनगर पोलिस व कसबा अग्ग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने निखिलचा शोध सुरू झाला. मात्र, पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने  शोध कार्यात अडथळे निर्माण झाले. रात्री आठ वाजेपर्यंत निखिलचा शोध लागला नव्हता. पोलिसांनी एनडीआरएफला याची माहिती दिली आहे. एनडीआरएफ रविवारी दाखल होण्याची शक्यता आहे. निखिल हा कामगार पुतळा परिसरात राहतो. त्याची आई साफसफाईचे काम करते. तर, निखिल हा एका वॉशिंग सेंटरमध्ये काम करतो. निखिल गेल्या वर्षीही मुठा नदीत पाणी सोडल्यानंतर पोहण्यासाठी आला होता. 

पाचही तरुणांना नदीत उडी मारुन स्टंटबाजी करायची होती. त्यांनी मागील वर्षी देखील अशाच प्रकारची स्टंटबाजी केल्याचे टिळक पूलावर उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी सांगितली. पाण्यात उडी मारल्यानंतर चौघे जण पोहत पाण्याबाहेर पडले. त्यावेळी ते घाबरलेले होते. घटनास्थळी जीवरक्षक पथक, पोलीस, अग्निशामक दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहे.- बाळासाहेब कोपनार, पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस ठाणे

टॅग्स :Puneपुणेriverनदीdrowningपाण्यात बुडणेmula muthaमुळा मुठा