शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

नगरसेवक वाशिंबेकर हत्या ; ८ जणांवर गुन्हा

By admin | Updated: March 25, 2015 23:24 IST

इंदापूर नगरपालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक धनंजय वाशिंबेकर हत्या प्रकरणी ८ जणांवर इंदापूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तीन पोलीस पथकांद्वारे आरोपींचा शोध सुरू आहे़

इंदापूर : इंदापूर नगरपालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक धनंजय वाशिंबेकर हत्या प्रकरणी ८ जणांवर इंदापूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तीन पोलीस पथकांद्वारे आरोपींचा शोध सुरू आहे़ नगरसेवक वाशिंबेकर यांच्या मंगळवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास मोटारीतून आलेल्या हल्लेखोरांनी बाबा चौकात सत्तूरने वार करुन त्यांना जबर जखमी केले़ गंभीर जखमी अवस्थेत त्यांना अकलुज येथील रुग्णालयात हलविण्यात आले़ तेथे उपचार सुरु असताना रात्री ११ वाजता त्यांचा मृत्यु झाला होता़ या घटनेने इंदापूर शहरात तणाव निर्माण झाला असून आज सकाळी भावपूर्ण वातावरणात वाशिंबेकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे यांनी सांगितले की, वाशिंबेकर यांचे सहकारी महावीर नामदेव लोंढे (वय ४२, रा. सरडेवाडी, ता. इंदापूर) याने पोलिसांकडे फिर्याद दिली. दीपक अभिमान साळुंखे, नागेश बापू गायकवाड, अंकुश बाबा चव्हाण, राहुल लंबाते (सर्व रा. इंदापूर, जि. पुणे) यांच्यासह ३ ते ४ अनोळखी युवकांनी मंगळवारी (दि. २४ मार्च) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बाबा चौकाजवळ, पांढऱ्या रंगाच्या बोलेरोमधून येऊन धनंजय गोपाळ वाशिंबेकर (वय ५१, रा. मंडई गल्लीनजिक, इंदापूर) यांच्यावर कोयता व इतर घातक शस्त्रांनी हल्ला चढविला. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केल्यामुळे आपल्यावर वार करण्यात आले. त्यामध्ये आपल्या हाताची बोटे तुटलेली आहेत. पाठीवर वार झाले आहेत. अज्ञात कारणावरून हल्ला झाल्याचे लोंढे याने फिर्यादीमध्ये म्हटले आहे, असे त्यांनी सांगितले.राजेंद्र मोरे म्हणाले, आरोपींच्या शोधार्थ तीन पोलीस पथके तयार केली आहेत. पुणे शहर, पुणे ग्रामीण व सोलापूर जिल्ह्यात पाठविली आहेत. बाबा चौकात घटनास्थळावर एक कोयता व चपलांचा जोड सापडला आहे. फिर्यादी लोंढे याच्याशी आरोपींबरोबर झटापट होताना, आरोपीचा मोबाईल फिर्यादीच्या हाती लागला. तो त्याने पोलिसांच्या ताब्यात दिला आहे, असे त्यांनी सांगितले. आरोपी लवकरच पोलिसांच्या तावडीत सापडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रयत्न निर्माण होऊ नये म्हणून आज सकाळपासून शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस मुख्यालय, वालचंदनगर, दौंड, सासवड, जेजुरी, वडगाव निंबाळकर, शिक्रापूर, शिरूर येथून सुमारे १५० पोलीस कर्मचारी, एक पोलीस उपअधीक्षक, पाच पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व फौजदार दर्जाचे १५ अधिकारी असा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. बाबा चौक, घटनास्थळ आणि शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)४धनंजय वाशिंबेकर सन २००१-२००२ या कालावधीत नगराध्यक्ष होते. सन १९९२ पासून २० वर्षे ते नगरसेवक होते. सर्वांना न्याय देण्याची भूमिका, नगरपरिषदेच्या कामगारापासून ते शहरातील सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी लढण्याची धमक असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या मृत्युबद्दल हळहळ व्यक्त होती. अतिरिक्तस्त्रावाने त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. ४वाशिंबेकर यांच्या हत्येचा निषेधार्थ इंदापूरकरांनी आज स्वेच्छेने इंदापूर बंद पाळला. शहरातील सर्व दैनंदिन व्यवहार आज दिवसभर बंद होते. नगरपरिषद बंद होती. शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. दुपारी दीडच्या सुमारास स्मशानभूमी वाशिंबेकर यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. आठ ते दहा हजार लोक उपस्थित होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी सकाळी घटनास्थळास भेट दिली.४मंगळवारी दुपारी धनंजय वाशिंबेकर यांनी नगरपरिषदेच्या बैठकीत सहभाग घेतला. पाणीप्रश्न गंभीर होत चालला आहे. उपाययोजना करु, असे म्हणत त्यांनी सर्व नगरसेवकांसह जाऊन माळवाडी येथील पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली. तेथून परतल्यानंतर रात्री कांबळे गल्लीत कावडीची आरती केली, ही त्यांची अखेरची आरती ठरली.