नगरसेवक विजय शेवाळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:12 IST2020-12-24T04:12:13+5:302020-12-24T04:12:13+5:30

पुणे : पुणे महापालिका प्रभाग क्रमांक ८ औंध-बोपोडी येथील भाजपचे वरिष्ठ नगरसेवक विजय बाबूराव शेवाळे (वय ६४) यांचे मंगळवारी ...

Corporator Vijay Shewale passes away | नगरसेवक विजय शेवाळे यांचे निधन

नगरसेवक विजय शेवाळे यांचे निधन

पुणे : पुणे महापालिका प्रभाग क्रमांक ८ औंध-बोपोडी येथील भाजपचे वरिष्ठ नगरसेवक विजय बाबूराव शेवाळे (वय ६४) यांचे मंगळवारी रात्री उशिरा अल्पशा आजाराने निधन झाले़ त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, मुलगा व दोन भाऊ असा परिवार आहे़

विजय शेवाळे सन २०१७ मध्ये महापालिकेत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते़ महापालिकेत त्यांनी क्रीडा समितीचे अध्यक्षपदी व औंध प्रभाव समितीचे अध्यक्षपदही संभाळले होते़ तसेच पुणे मर्चंट बँकेच्या अध्यक्षपदीही त्यांनी कामकाज केले आहे़ आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ यावेळी खासदार गिरीष बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, बाबूराव चांदेरे यांच्यासह सहाय्यक आयुक्त जयदीप पवार, संदीप कदम आदी उपस्थित होते़ विद्यमान नगरसेवक असलेल्या शेवाळे यांच्या निधनामुळे बुधवारी दुखवटा म्हणून पुणे महापालिकेस सुट्टी जाहिर करण्यात आली़

---

फोटो मेल केला आहे़

Web Title: Corporator Vijay Shewale passes away