नगरसेवक शिळीमकरांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By Admin | Updated: January 18, 2015 01:18 IST2015-01-18T01:18:00+5:302015-01-18T01:18:00+5:30

बेकायदेशीरपणे दुकान पाडून नुकसान केल्याप्रकरणी बिबवेवाडीतील नगरसेवक राजेंद्र आबा शिळीमकर यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Corporator Shailimkar, along with six others, has been booked in the case | नगरसेवक शिळीमकरांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नगरसेवक शिळीमकरांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : बेकायदेशीरपणे दुकान पाडून नुकसान केल्याप्रकरणी बिबवेवाडीतील नगरसेवक राजेंद्र आबा शिळीमकर यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराने दिलेल्या अर्जावरून पोलिसांनी अ‍ॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल केला आहे.
राजेंद्र आबा शिळीमकर, सतीश नाना मोरे, मनोज सतीश मोरे, श्रीपाल राजेंद्र शहा, महेश यशवंत शिळीमकर, जयंत गुंदेशा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी प्रभाकर महादू वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे. स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघमारे यांचे कात्रज येथील मोकळ्या जागेमध्ये दुकान होते. ही जागा मूळची सतीश मोरे यांच्या मालकीची आहे. या जागेचा विकसन करारनामा (डेव्हलपमेंट अ‍ॅग्रीमेंट) केले होते. त्यांच्या मध्ये ठरलेल्या मुदतीत या जागेवर बांधकाम न झाल्यामुळे त्याने शहा, शिळीमकर यांना जागा विकली.
त्यांच्यामध्ये जागेचा व्यवहार झाल्यानंतर वाघमारे यांच्याशी जागा सोडण्यासंदर्भात बोलणी सुरू असतानाच १२ डिसेंबर २०१४ रोजी शहा यांनी जेसीबीच्या साह्याने वाघमारे यांचे दुकान पाडले. या दुकानामधील स्टेशनरी, बांगड्या आदी साहित्य मिळून पाच ते सहा लाखांचे नुकसान झाल्याची तक्रार वाघमारे यांनी दिली होती. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिसांनी कलम ४४७ नुसार गुन्हा दाखल केला होता. आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा तक्रारी अर्जही त्यांनी दिला होता. त्यांनी जातीचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर पोलिसांनी अ‍ॅट्रॉसिटीचे कलम लावले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Corporator Shailimkar, along with six others, has been booked in the case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.