‘बायोमेट्रिक’ला नगरसेवक राजी
By Admin | Updated: July 4, 2015 00:29 IST2015-07-04T00:29:22+5:302015-07-04T00:29:22+5:30
महापालिकेच्या मुख्य सभांना उपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांची हजेरी आता बायोमेट्रिक्स पद्धतीने घेतली जाणार आहे. गेले वर्षभर या हजेरीस विरोध करणाऱ्या

‘बायोमेट्रिक’ला नगरसेवक राजी
पुणे : महापालिकेच्या मुख्य सभांना उपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांची हजेरी आता बायोमेट्रिक्स पद्धतीने घेतली जाणार आहे. गेले वर्षभर या हजेरीस विरोध करणाऱ्या नगरसेवकांचा असलेला विरोध अखेर मावळला असून, गेल्या तीन दिवसांत तब्बल ९0 नगरसेवकांनी आपल्या हातांचे ठसे दिले आहेत. या प्रणालीमुळे सभेस उपस्थित नसतानाही, सभा संपल्यानंतर उपस्थिती रजिस्टरमध्ये सह्या करण्याच्या प्रकारांना आळा बसणार आहे.
दीड वर्षापूर्वी महापालिकेच्या श्री छत्रपती शिवाजीमहाराज सभागृहाचे तब्बल तीन कोटी रुपये खर्चून नूतनीकरण करण्यात आले आहे. या सभागृहाÞच्या बाहेर नगरसेवकांच्या हजेरी घेण्यासाठी बायोमेट्रिक्स मशिन लावण्यात आले आहे. या मशिनमुळे सदस्यांना केवळ सभा सुरू असतानाच हजेरी लावता येणार असल्याने अनेक सदस्यांनी या प्रणालीस विरोध केला होता. तसेच नोंदणीसाठी नकार दिला केला होता. मात्र, प्रशासनाने ही यंत्रणा राबविणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी गेल्या दोन दिवसांपासून महापालिकेत गर्दी केली असून, शुक्रवारी अखेरपर्यंत १५७ पैकी ९0 नगरसेवकांची नोंदणी पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.