शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

‘अनन्या’ मारणार कोरोनाचा विषाणू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 02:44 IST

नॅनो तंत्रज्ञान : पुण्यातील डीआयएटीने बनविले विषाणूनाशक

पुणे : कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानावर आधारित विषाणूनाशक पुण्यातील डिफेन्स इस्टिट्यूट आॅफ अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी (डीआयएटी) संस्थेने बनवले आहे. हे विषाणूनाशक मानवी शरीरातही प्रवेश करण्यास प्रतिबंध करते, असा दावा संस्थेने केला आहे. ‘अनन्या’ असे या विषाणूनाशकाचे नामकरण केले असून, त्याचे उत्पादन लवकरच सुरु होणार आहे. डीआयएटी या अभिमत विद्यापीठातील फिजिक्स विभागप्रमुख डॉ. संगीता काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की पृष्ठभागावरील कोरोनाचे विषाणूनष्ट करण्यासाठी याचा उपयोग होतो. विषाणूची रचना लक्षात घेऊन सोप्या पद्धतीने सिल्व्हर नॅनो पार्टीकल आणि पॅरासिटीमॉलसारख्या औषधाचा वापर करुन ते बनविण्यात आले आहे. सात ते आठ तासात विषाणू नष्ट करण्याची क्षमता असून, चार ते पाच दिवसापर्यंत त्याचा प्रभाव राहतो. सुमारे १५० रूपयांत एक लिटर औषध तयार होते. यात अल्कोहोल नसते. फॅब्रिक, प्लॅस्टिक आणि धातूच्या वस्तूंवर हे प्रभावीपणे काम करते.असा होतो कोरोना विषाणू नष्टसामान्य सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असते. ते हातावर लावल्यास विषाणूला प्रतिबंध होतो. तो समूळ नष्ट होत नाही. अनन्या विषाणूनाशकामुळे कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होतो, हे प्रयोगात सिद्ध झाले आहे. कोरोना विषाणू प्रोटीनच्या साह्याने मानवी शरीरात प्रवेश करतो. ‘अनन्या’ प्रोटीन नष्ट करतो. यामुळे पहिल्याच टप्प्यात विषाणू मरतो. सिल्वर नॅलो पार्टीकल दुसऱ्या टप्प्यात विषाणूचे प्रोटीन नष्ट करून त्याचे आवरण तोडून आत असलेले मेंब्रीन नष्ट करतात. त्यानंतर एनआरए मटेरीअल बाहेर आल्याने विषाणू मृत होतो.आमच्या विद्यापीठात कोरोना प्रतिबंधासाठी अनेक तंत्रज्ञान विकसित केले आहेत. ‘अनन्या’मुळे हा विषाणू नष्ट करण्यास मदत होणार आहे. पेटंटसाठी आम्ही प्रक्रिया सुरु केली आहे.- सी. पी. रामनारायण,कुलगुरू, डीआयएटीविषाणू मारण्यासाठी विविध प्रकारची विषाणूनाशके आहेत. त्यांचा वापर करून विषाणूवरील प्रोटीनचे आवरण नष्ट करता येऊ शकते. याला कोरोना विषाणूही अपवाद नाही.- डॉ. अखिलेश मिश्रा,माजी संचालक, एनआयव्ही

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्या