Coronavirus Vaccination Pune : खुशखबर ! पुण्यात अनोखी शक्कल ; लस घ्या अन्  बाकरवडी घरी न्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 03:23 PM2021-04-05T15:23:06+5:302021-04-05T15:25:28+5:30

पुण्यात लसीकरणाला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावा म्हणून अनोखा उपक्रम..

Coronavirus Vaccination Pune: GoodNews! A unique look in Pune; get vaccinated and take home Bakarwadi ... | Coronavirus Vaccination Pune : खुशखबर ! पुण्यात अनोखी शक्कल ; लस घ्या अन्  बाकरवडी घरी न्या...

Coronavirus Vaccination Pune : खुशखबर ! पुण्यात अनोखी शक्कल ; लस घ्या अन्  बाकरवडी घरी न्या...

googlenewsNext

पुणे : पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. मात्र याच दरम्यान शहरात विविध केंद्रावर लसीकरणाची मोहीम देखील जोरदारपणे सुरू आहे.  परंतू,नागरिकांचा लसीकरणाच्या मोहिमेला आणखी प्रतिसाद मिळावा यासाठी एक पुण्यात लसीकरणाचे प्रमाण वाढावे यासाठी 'पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स'च्या माध्यमातून अनोखी शक्कल लढविली आहे.''लस घ्या अन् बाकरवडी घरी घेऊन जा..'' या संकल्पनेतून जास्तीत जास्त नागरिकांना लस घेण्यासाठी प्रतिसाद मिळावा हा उद्देश या उपक्रमापाठीमागे आहे.

पुण्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी यासाठी त्यांना प्रोत्साहनपर खाद्य पदार्थ देण्यात येणार आहे. 

https://twitter.com/cIndraneel/status/1378686298693627908?s=20

''पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स'' च्या माध्यमातून इंद्रनील चितळे यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. या माध्यमातून आठवडाभरात मिळून साधारण १५ हजार बाकरवडीची पाकिटे वाटण्यात येणार आहेत.मात्र साठी कोणतेही लसीकरण केंद्र ठरवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अधिकाधिक नागरिक उत्सुकतेने लस घेतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून दिवसाला १ लाख लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. त्यासाठी सर्व स्तरातून लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न होत आहे, त्याचाच हा एक भाग मानला जात आहे.

 याबाबत चितळे उद्योग समूहाचे इंद्रनील चितळे म्हणाले की,'आम्ही कोणत्याही एका केंद्रावर बाकरवडीची पाकिटे देणार नाही. तर वेगवेगळ्या केंद्रांवर स्वयंसेवांमार्फत पाकिटे दिली जाणार आहेत. केंद्र जाहीर केल्यास गर्दी होऊ नये हाच यामागचा उद्देश आहे'.

Web Title: Coronavirus Vaccination Pune: GoodNews! A unique look in Pune; get vaccinated and take home Bakarwadi ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.