शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : पुण्यात रविवारी कोरोनामुळे एकही मृत्यू नाही, मात्र रुग्णांच्या संख्येत ४२ ने वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 22:52 IST

लॉकडाऊननंतर ६ एप्रिल पासून शहरातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण असलेला भाग सील करून, सुरू केलेल्या विशेष तपासणी मोहिमेमुळे दिवसागणिक नवीन कोरोनाबाधित रूग्णांची संख्या मात्र वाढत आहे़

पुणे - कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूचे सत्र रविवारी थांबले असून, दिवसभरात एकाही कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झाला नाही़ विशेष म्हणजे रविवारचा हा दिवस आनंदवार्ता घेऊन आला असून, आज तब्बल १८ कोरोनाबाधित असलेले रूग्ण पूर्णपणे ठणठणीत होऊन घरी गेले आहेत.   लॉकडाऊननंतर ६ एप्रिल पासून शहरातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण असलेला भाग सील करून, सुरू केलेल्या विशेष तपासणी मोहिमेमुळे दिवसागणिक नवीन कोरोनाबाधित रूग्णांची संख्या मात्र वाढत आहे़ रविवारी या संख्येत ४२ ने वाढ झाली असून, आत्तापर्यंत पुणे शहरात (पुणे महापालिका हद्दीत) एकूण ५८६ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत़ यापैकी शहरातील ४९ जणांचा व बारामतीतील १ अशा ५० जणांचा मृत्यू शनिवारपर्यंत झाला असला तरी हे सर्व रूग्ण कोरोनाबरोबर अन्य जर्जर आजाराने ग्रस्त होते.      रविवारचा दिवस सर्वांना दिलासा देणारा ठरला असूून आज तब्बल १८ जणांना उपचारानंतर कोरोनामुक्त म्हणून घरी सोडण्यात आले आहे़ आजपर्यंत एकूण ५५ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ सध्या नायडू हॉस्पिटलमध्ये १८१ रूग्णांवर उपचार चालू असून, यापैकी एकही रूग्ण गंभीर नसल्याचे आढळून आले आहे़ एकट्या नायडू हॉस्पिटलमधून आत्तापर्यंत ३० रूग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत़ तर ससून हॉस्पिटलमधून ७ जण, जहाँगिर हॉस्पिटलमधून १, भारती हॉस्पिटलमधून १ व दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधून ३ रूग्ण उपचाराअंती घरी गेले आहेत. कोरोनाबाधित रूग्णांपैकी १५ गंभीर रूग्णांमध्ये ११ रूग्ण हे एकट्या ससून हॉस्पिटलमध्ये आहेत़ तर अन्य रूग्ण खाजगी हॉस्पिटलमध्ये आहेत़

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणे