शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : पुण्यात अद्याप जमावबंदी लागू नाही मात्र ; एकत्र न येण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 18:32 IST

पुण्यात जमावबंदी लागू करण्यात आली नसून 144/1 कलम लागू करण्यात आले आहे. ज्याअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांना आपले अधिकार वापरता येणार आहेत.

पुणे : काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारकडून विविध पाऊले उचलण्यात येत आहे. राज्यभरातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून मुंबईमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान पुण्यात 144 कलामांतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली नसून कलम 144 /1 लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना असलेल्या अधिकारांचा त्यांना वापर करता येणार आहे. त्याचबराेबर टुर्स, ट्रॅव्हल कंपन्या आणि हाॅटेल व्यावसायिकांनी त्यांच्याकडील परदेशी नागरिकांची माहिती लपविल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. 

पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेमध्ये 144 / 1 पुण्यात लागू केल्याचे जिल्हाधिकारी नवल किशाेर राम यांनी स्पष्ट केले. सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील काेराेनाबाधित रुग्णांची संख्या 16 वर गेली आहे. तर राज्यातील काेराेनाबाधितांची संख्या 39 झाली आहे. काेराेनाचा प्रसार वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून माेठ्याप्रमाणावर खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 144 /1 लागू केले आहे. यापूर्वीच माॅल, मल्टिप्लेक्स, स्विमिंग पूल, जिम बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले हाेते. त्याचबराेबर सर्व सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. राज्यातील शाळा, महाविद्यालये देखील बंद ठेवण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी एकत्र न येता गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. 

काय आहे कलम 144/ 1 या कलमाअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी एकत्र न येण्याबाबत तसेच जी आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश साथ नियंत्रण कायद्याअंतर्गत दिले आहेत, त्याचे उल्लंघन केल्यास त्यावर कायदेशीर कारवाई जिल्हाधिकाऱ्यांना करता येणार आहे. त्याचबराेबर ज्या टुर्स, ट्रॅव्हल कंपन्या, तसेच हाॅटेल्स यांनी परदेशी नागरिकांबाबतची माहिती लपवली असेल त्यांच्यावर देखील या कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाPuneपुणेNavalkishor Ramनवलकिशोर राम