शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : पुणेकरांचा चहा हाेणार कडू ; अमृततुल्ये राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 21:35 IST

दुकाने आणि हाॅटेलनंतर आता पुण्यातील अमृततुल्ये देखील पुढील दाेन दिवस बंद राहणार आहेत.

पुणे  : काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययाेजना करण्यात येत आहे. राज्यातील काही शहरांमध्ये जमावबंदी करण्यात आली आहे तर गरज नसताना बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशातच पुण्यातील व्यापाऱ्यांना तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे तर हाॅटेल देखील बंद ठेवण्यात आले आहेत. यातच आता काेराेनाचा फैलाव हाेऊ नये यासाठी पुण्यातील अमृततुल्य व्यावसायिकांनी देखील आपले अमृततुल्य दाेन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

राज्यात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत असून दराराेज काेराेनाच्या रुग्णांमध्ये वाढ हाेत आहे. त्यामुळे नागरिकांनी एकत्र न येण्याचे आवाहन सर्वच स्तरातून करण्यात येत आहे. पुणेकर आणि अमृततुल्यचं एक वेगळंच नातं आहे. पुण्यातील नाक्यानाक्यावर असणाऱ्या अमृततुल्यमध्ये नेहमीच नागरिकांची गर्दी असते. हाॅटेलच्या चहापेक्षा अमृततुल्यचा चहा नागरिकांच्या अधिक पसंतीचा आहे. परंतु काेराेनाचा प्रादुर्भाव पुणे शहरात वाढत असल्याने आता ही अमृततुल्य देखील बंद ठेवण्याचा निर्णय पुणे शहर अमृततुल्य व्यावसायिक असाेसिएशनने घेतला आहे. 

दरम्यान पुणे शहरातील दुकाने, शाळा, महाविद्यालये बंद असल्याने शहरात बुधवारी शांतता हाेती. रस्त्यांवर तुरळक रहदारी हाेती. नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत घरीच राहणे पसंत केले. पुढील काही दिवस पुण्यात हिच परिस्थिती असण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणे