शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

Coronavirus :दिलासादायक! पुणे जिल्ह्यात १७७ रुग्ण कोरोनामुक्त, एकूण रुग्णसंख्या ३ हजार ५६७  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 02:24 IST

यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३ हजार ५६७ वर जाऊन पोहचली. पण यापैकी आता पर्यंत १८७९ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत

पुणेपुणे जिल्ह्यात शुक्रवारी (दि.१५) रोजी एका दिवसांत १७७ कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले. तर एका दिवसांत १४१नवीन कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची भर पडली. यामध्ये गंभीर असलेल्या 5 मृत्यू झाला. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३ हजार ५६७ वर जाऊन पोहचली. पण यापैकी आता पर्यंत १८७९ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, यामुळे सध्या जिल्ह्यात १ हजार ५०२रूग्ण वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. पुणे जिल्ह्यात शुक्रवारी सुमारे १ हजार 8 संशयित रूग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी १४१ रूग्णांचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले. गेल्या काही दिवसांत प्रशासनाकडून जाणीवपूर्वक प्रयत्न करून जास्तीत जास्त संशयित रूग्णांची तपासणी केली जात आहे. यामध्ये देखील कन्टमेन्ट झोन मध्ये अधिक लक्ष केंद्रीत केले जात आहे. जिल्ह्यात सर्वाधिक वाढ नेहमीप्रमाणे पुणे शहरामध्ये असून, कॅन्टोनमेन्ट हद्दीत देखील रूग्ण वाढीचा वेग अधिक आहे. तर ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांत ग्रीन झोनमध्ये असलेल्या तालुक्यामध्ये कोरोना शिरकाव होताना दिसत आहे.खेड तालुक्यात प्रथमच एक रूग्ण सापडला आहे. परंतु या रूग्णांची कोरोनाची हिस्ट्री पुणे शहरातील आहे. यामुळे आता शहरी भागा सोबतच ग्रामीण भागावर देखील अधिक लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.  शहरातील कोरोनाबधितांचा आकडा  तीन हजारांचा पारपुणे : शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा तीन हजारांच्या पार गेला असून दिवसभरात रूग्णांमध्ये तब्बल १०६ रूग्णांची भर पडली असून १४४ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. शहरात रूग्णांची एकूण संख्या ३ हजार ९३ झाली असून प्रत्यक्षात ऍक्टिव्ह रुग्ण १ हजार २८९ आहेत. दिवसभरात एकूण पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण १३२ रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. शुक्रवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या १०६ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १०, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ६७ तर खासगी रुग्णालयांमध्ये २९ रुग्ण दाखल झाले आहेत. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १३२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ३३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ९९ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात शुक्रवारी पाच मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १७४ झाली आहे. दिवसभरात एकूण १४४ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये नायडू रुग्णालयातील १२३ रुग्ण, ससूनमधील ०६ तर  खासगी रुग्णालयांमधील १५ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ हजार ६३० झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १ हजार २४२ झाली आहे. दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १६५२ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २९ हजार १ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये ८७४, ससून रुग्णालयात ११० आणि खासगी रुग्णालयांमध्ये ३०५ रुग्ण उपचार घेत आहेत. एकूण बाधित रूग्ण : ३५६७पुणे शहर : ३१०६पिंपरी चिंचवड : १८४ कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : २७८मृत्यु : १८६घरी सोडलेले : १८७९

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याPuneपुणे