Coronavirus Pune : दिलासादायक! पुणे जिल्ह्यात सोमवारी १० हजार  ५६६ रुग्णांची कोरोनावर मात; ९ हजार ५८२ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 09:39 PM2021-04-19T21:39:33+5:302021-04-19T21:40:33+5:30

पुणे शहरात कोरोनाबाधितांच्या वाढीच्या तुलनेत दोन हजार अधिक कोरोनामुक्त 

Coronavirus Pune: Comfortable! 10 thousand 566 patients discharged from corona in Pune district on Monday; 9 thousand 582 new patients | Coronavirus Pune : दिलासादायक! पुणे जिल्ह्यात सोमवारी १० हजार  ५६६ रुग्णांची कोरोनावर मात; ९ हजार ५८२ नवे रुग्ण

Coronavirus Pune : दिलासादायक! पुणे जिल्ह्यात सोमवारी १० हजार  ५६६ रुग्णांची कोरोनावर मात; ९ हजार ५८२ नवे रुग्ण

googlenewsNext

पुणे : पुणे जिल्ह्यात सोमवारी १० हजार ५६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ९ हजार ५८२ नवीन रुग्णांची भर पडली आहे. पुणे शहरात सोमवारी ४ हजार ५८७ तर पिंपरीत २ हजार २७९ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. तसेच पुणे शहरात ६ हजार ४७३ तर पिंपरीत १ हजार ९८० जण कोरोनातून ठणठणीत बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 

जिल्ह्यात विविध रुग्णालयातील दिवसभरात एकूण १०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्याची सक्रिय कोरोना १ लाख २ हजार ५२९ झाली असून त्यात ७५ हजार ४७६ हॉस्पिटलमध्ये तर २७ हजार ५३ गृह विलगिकरणात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ११ हजार ५३५ झाली आहे. तर शहरात संख्या ५ हजार ५४५ झाली आहे. पुणे जिल्ह्यात आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ६ लाख १८ हजार १६३ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ७ लाख ३२ हजार ५८ झाली आहे.

.......

पुणे शहरात कोरोनाबाधितांच्या वाढीच्या तुलनेत दोन हजार अधिक कोरोनामुक्त 

पुणे शहरात सोमवारी प्रथमच कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण हे सुमारे दोन हजाराने अधिक असल्याचे दिसून आले आहे़ सोमवारी दिवसभरात ४  हजार ५८७ कोरोनाबाधित आढळून आले असून, ६ हजार ४७३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात २० हजार ८८९ जणांनी कोरोना तपासणी केली असून, तपासणीच्या तुलनेत आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची टक्केवारी ही २१.९५ टक्के इतकी आहे.

दरम्यान, आज दिवसभरात ७६ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २२ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.६५ टक्के इतका आहे.

पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ५ हजार ९२६ कोरोनाबाधित रूग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार २६७ रूग्ण हे गंभीर आहेत. शहरात आत्तापर्यंत १८ लाख ९० हजार ६२४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ३ लाख ७१ हजार ८२४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ३ लाख १० हजार ९६५ कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ही सद्यस्थितीला ५४ हजार ६९६ इतकी झाली आहे. रविवारी हाच आकडा ५६ हजार ६३६ इतका होता. 

---------------------------------

Web Title: Coronavirus Pune: Comfortable! 10 thousand 566 patients discharged from corona in Pune district on Monday; 9 thousand 582 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.