शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

CoronaVirus: ...अखेर मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अमृतांजन पूल झाला इतिहासजमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 19:42 IST

साधारणतः प्रत्येक खांबाला पायाजवळ 45 होल करण्यात आले होते. दिवसभर हे काम पूर्ण केल्यानंतर सायंकाळी सव्वासहा वाजता पूल पाडण्याकरिता स्फोट घडविण्यात आला. एकाच धमाक्यात सर्व पूल पत्त्यांसारखा खाली कोसळला.

लोणावळा : रायगड व पुणे जिल्ह्याला जोडणारा ऐतिहासिक अमृतांजन पूल आज अखेर इतिहासजमा झाला. द्रुतगती मार्गाला अडथळा ठरणार्‍या पुलाच्या चारही खांबांना एकाच वेळी ब्लास्टिंग करून रविवारी सायंकाळी सव्वासहा वाजता स्फोट करून सदरचा पूल जमीनदोस्त करण्यात आला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून नियुक्त केलेल्या नवयुग टीमचे प्रमुख अनिल कुमार व टीमकडून हे काम आज फत्ते झाले. आज रविवारी सकाळपासून पुलाच्या दगडी खांबांमध्ये सुरुंगाची दारू भरण्याकरिता होल करण्याचे काम सुरू होते. साधारणतः प्रत्येक खांबाला पायाजवळ 45 होल करण्यात आले होते. दिवसभर हे काम पूर्ण केल्यानंतर सायंकाळी सव्वासहा वाजता पूल पाडण्याकरिता स्फोट घडविण्यात आला. एकाच धमाक्यात सर्व पूल पत्त्यांसारखा खाली कोसळला.4 एप्रिल ते 14 एप्रिलदरम्यान हा पूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पाडण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. काल पुलावरील पाईपलाईन हलविल्यानंतर आज पुलाच्या खांबांना ब्लास्टिंगकरिता होल करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. याकरिता पुण्याकडे जाणारी सर्व वाहने अंडा पाँइट येथून जुन्या मार्गाने तर मुंबईकडे जाणारी वाहने लोणावळा एक्झिट येथून लोणावळा शहरातून वळविण्यात आली होती. ब्लास्टिंगच्या वेळी दोन्ही बाजूची वाहतूक थांबविण्यात आली होती. ब्रिटिशकाळात कोकण प्रांत हा दक्षिण महाराष्ट्राला जोडण्याकरिता ह्या पुलाची निर्मिती करण्यात आली होती.सदर पूल धोकादायक झाल्याने त्याच्यावरून वाहतूक मागील काही वर्षांपासून बंद करण्यात आली होती. ह्या पुलाच्या खालून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जातो, पुलामुळे मार्गावर वळण आले होते, तसेच रस्ता अरुंद झाला होता. यामुळे वारंवार या ठिकाणी अपघात घडत असल्याने तो वाहतुकीकरिता अडचणीचा ठरत होता. मागील तीन वर्षांपासून हा पूल पाडण्याच्या हालचाली सुरू होत्या, मात्र द्रुतगती मार्गावरील प्रचंड वाहतुकीमुळे ते शक्य होत नव्हते. सध्या भारतात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्याने लाॅकडाऊन आहे, त्यामुळे द्रुतगती मार्गावरील वाहतूक तुरळक असल्याने येत्या 4 एप्रिल ते 14 एप्रिलदरम्यान हा पूल पाडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आज पूल पाडण्यात आला असून पुढील, दोन दिवसात रस्त्यावरील मातीचे ढीग व दगड बाजूला केले जाणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वे