शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
3
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
4
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
5
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
6
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
7
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
8
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
9
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
10
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
11
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
12
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
13
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
14
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
15
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
16
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
17
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
18
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
19
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
20
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral

Coronavirus Police : लसीकरणानंतरही पोलीस कोरोनाच्या विळख्यात; पावणे तीनशे पोलीस अधिकारी, कर्मचारी बाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 12:36 AM

पुणे शहर पोलीस दलातील २८१ पोलीस अधिकारी व कर्मचारी सध्या कोरोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

पुणे : पुणे शहर पोलीस दलातील ८० टक्क्यांहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्यांच्यातील ३५ टक्के जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. असे असताना आता आलेल्या दुसर्‍या लाटेत पहिला डोस घेतलेल्या अनेक पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे शहर पोलीस दलाने आता पहिल्या लॉकडाऊनच्या काळात ज्या पद्धतीने पोलिसांसाठी उपाययोजना राबविल्या होत्या. त्या पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. 

सोमवारी एकाच दिवशी ३ अधिकारी आणि २९ अंमलदार यांना लागण झाल्याचे आढळून आले आहे.  पुणे शहर पोलीस दलातील २८१ पोलीस अधिकारी व कर्मचारी सध्या कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यात ३० पोलीस अधिकारी असून २५१ पोलीस अंमलदार यांचा समावेश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर आतापर्यंत शहरातील १ हजार ९७१ जणांना लागण झाली असून त्यांच्यापैकी १ हजार ७१६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यादरम्यान १३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. चालू आठवड्यात ७४ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

याबाबत अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी सांगितले की, शहर पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात आले असून जवळपास ३० टक्के पोलिसांना दुसरा डोस देण्यात आला आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर पोलीस दलात कोरोना बाधित होणार्‍यांचे प्रमाण वाढलेले दिसून आले. त्यामुळे सर्वांची रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात अनेक जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पहिल्या लॉकडाऊनच्या काळात ज्याप्रमाणे सुरक्षाविषयक उपाय योजना आखण्यात आल्या होत्या. त्या पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात वेलनेस ऑफिसरची नेमणूक करण्यात आली आहे. पोलीस ठाणे व विविध पोलीस कार्यालयांना मास्क, सॅनिटायझर पुरविणे़, बाधित अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी विलगीकरण कक्षात राखीव बेड ठेवणे, तेथे त्यांना जागा मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचबरोबर पोलीस कर्मचार्‍यांमध्ये जागृती करण्यात येत आहे. .........१८ एप्रिलपर्यंतची स्थितीउपचार घेत असलेले एकूण पोलीस - २४२ ( २७ अधिकारी, २२२ अंमलदार)एकूण बरे झालेले - १७१६मृत्यु - १३एकूण बाधित १९७१एकूण हजर पोलीस - ७४४ अधिकारी, ७९०० अंमलदारपहिला डोस घेतलेले - ७०२९ ( ५९८ अधिकारी, ६४३१ अंमलदार) दुसरा डोस घेतलेले - ३११९ (२१४ अधिकारी, २९०५ अंमलदार)एकूण बाधित कुटुंबियांची संख्या - ४४६२बाधित कुटुंबियांची संख्या - ५४९

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसcommissionerआयुक्तCorona vaccineकोरोनाची लस