शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: अजितदादांच्या बारामतीत कोरोनानं पुन्हा काढलं डोकं वर; नववा पॉझिटिव्ह रुग्ण सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 09:44 IST

बारामती तालुक्यातील कटफळ येथील हा रुग्ण असून ग्रामीण भागातील दुसरा तर, बारामती परिसरातील हा नववा  रुग्ण आहे.

बारामती : बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागात दुसरा  कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ३ मे रोजी हा रुग्ण उपचारासाठी त्याच्या मुंबई येथील नातीकडे गेला आहे. ४ मे रोजी केलेल्या तपासणीमध्ये त्याचा अहवाल ' पॉझिटिव्ह ' आल्याचे स्पष्ट झाले आहे. बारामती तालुक्यातील कटफळ येथील हा रुग्ण असून ग्रामीण भागातील दुसरा तर, बारामती परिसरातील हा नववा  रुग्ण आहे. त्याच्यावर मुंबई येथे  शहरात उपचार सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.शहरात श्रीरामनगर, समर्थनगर म्हाडा वसाहत परिसरसह तालुक्यात माळेगाव येथे आजपर्यंत एकूण आठ रुग्ण सापडले आहेत. त्यापैक भाजीविक्रेता असणाऱ्या रुग्णासह माळेगाव येथील रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज बारामतीचे एकाच कुटुंबातील सहा  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शेवटच्या रुग्णाला ३० एप्रिल रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता. बारामती कोरोनामुक्त झाल्याच्या आनंदात बारामतीकर होते, हा आनंद अल्पावधीचाच ठरला आहे .नववा रुग्ण सापडल्याचा अहवाल बारामतीकरांच्या अडचणीत पुन्हा एकदा  वाढ झाली आहे. आज सापडलेला रुग्ण कटफळ येथील आहे.  ग्रामीण बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील दुसरा रुग्ण असल्याने ग्रामीण भागात लोकांना बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणीच बाहेर फिरू, नये घरात राहावे, अशी सूचना प्रशासनाच्या वतीने करण्यात  आली आहे.

सदरची परिस्थिती लक्षात घेता कटफळ गाव बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले  आहे. त्या क्षेत्रात सर्व प्रकारची वाहतूक नियंत्रित करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांना यातून वगळले असून, झोनच्या प्रत्येक मुख्य रस्त्यावर चौकीची व्यवस्था करण्यात आली आहे. तिथून सर्व वाहने तपासणी करून सोडण्यात येणार  असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच त्या भागात आरोग्य विभागामार्फत  तातडीने सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. एमआयडीसीतील कंपन्यांना कटफळ परिसरातील कामगारांना कामावर घेताना दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.आज सापडलेल्या रुग्णाच्या  पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याला अपचनाचा त्रास होत होता. त्यामुळे तो ३ मुंबई येथील नातीकडे गेला होता. त्या ठिकाणी केलेल्या तपासणीत त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याला कोणत्या ठिकाणी कोरोना संसर्ग झाला हे प्रशासन शोधावे लागणार आहे. बारामती ऑरेंज झोन होण्याचा मार्ग खडतर झाला आहे. येथील दुकाने सुरू होणार का हा प्रश्न सध्या तरी कायम आहे. नुकतीच कालपासून एमआयडीसी सुरू झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस