शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: ‘जलनेती’ केल्याने कोरोनाच्या विषाणूचा धोका कमी - डॉ. धनंजय केळकर यांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 06:52 IST

डॉ. केळकर यांनी योगातील एक पारंपरिक क्रिया ‘जलनेती’चा अभ्यास सुरू केला आहे. रुग्णालयातील सुमारे तीन हजार डॉक्टर, परिचारिका व कर्मचा-यांवर तीन महिने अभ्यास सुरू आहे. यातून सकारात्मक निष्कर्षही मिळत असल्याचा त्यांचा दावा आहे.

- राजानंद मोरेपुणे : जगभरात कोरोना विषाणुला रोखण्यासाठी औषधे व लसींच्या चाचण्या सुरू असताना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांनी योगामधील ‘जलनेती’मुळे कोरोना विषाणुला दूर ठेवू शकत असल्याचा दावा केला आहे.‘मागील तीन महिन्यांपासून नियमित जलनेती करणाऱ्या सहाशेवर डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. जलनेतीने कोरोनाचा संसर्ग होणारच नाही, असा दावा नाही. मात्र संसर्गाची शक्यता कमी होते’, असे रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी सांगितले.डॉ. केळकर यांनी योगातील एक पारंपरिक क्रिया ‘जलनेती’चा अभ्यास सुरू केला आहे. रुग्णालयातील सुमारे तीन हजार डॉक्टर, परिचारिका व कर्मचा-यांवर तीन महिने अभ्यास सुरू आहे. यातून सकारात्मक  निष्कर्षही मिळत असल्याचा त्यांचा दावा आहे.‘लोकमत’ला माहिती देताना डॉ. केळकर म्हणाले, मी साडे चार वर्षांपासून जलनेती करत आहे. कधीही संसर्ग होऊन सर्दी किंवा फ्लुची लक्षणे आढळली नाहीत. तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणारे रुग्णालयातील १२०० डॉक्टर व इतर कर्मचाºयांपैकी ६०० जण दिवसातून दोनदा जलनेती करत आहेत. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग, हातांची स्वच्छता आदी दक्षता घेतली जाते. या काळात त्यातील एकालाही कोरोना फ्लुची किंवा कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत. जलनेती न करणारे अन्य ६०० जण तसेच रुग्णालयातील इतर १८०० जणांपैकी २२ जणांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे होती. हा तुलनात्मक अभ्यास आणखी तीन महिने सुरू राहील. नंतर हे संशोधन प्रसिद्ध केले जाणार आहे.जलनेती कोणीही करू शकते1जलनेतीमुळे नाकामध्ये सतत ओलावा राहतो. नाक स्वच्छ होऊन विषाणुंचा भार कमी होतो. नाक कोरडे पडले तर संसर्गाची शक्यता अधिक वाढते. नाकाची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी जलनेती केली जाते.2बायपास, अस्थमा किंवा अन्य आजार असलेले तसेच जलनेतीचे पात्र व्यवस्थितपणे धरू शकणारे कोणीही जलनेती करू शकतात. माझे ९२ वर्षांचे वडील दीड महिन्यांपासून जलनेती करत आहेत, अशी माहिती डॉ. केळकर यांनी दिली. ... तर ठरेल गेमचेंजरपुढील तीन महिन्यांतील निष्कर्षामधून जलनेतीचा प्रभावीपणे परिणाम होत असल्याचे दिसून आल्यास हे महत्वपूर्ण संशोधन ठरेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची निश्चितपणे दखल घेतली जाईल, असा आशावाद डॉ. केळकर यांनी व्यक्त केला. जलनेतीचे तोटे नाहीत. शक्य आहे ते करू शकतील, यासाठी माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्यdocterडॉक्टर