शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : पुण्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ ; बाधितांचा आकडा पाचवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 18:35 IST

सोमवारी कोरोनाची लागण झालेल्या दाम्पत्याशी संबंधित आणखी दोन आणि इतर एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समजते आहे. या दांपत्यासाेबत 40 अन्य पर्यटक दुबईला एका फिरण्यास गेले हाेते. या 40 लाेकांची नावे आणि संपर्क क्रमांक प्रशासनाकडे उपलब्ध असून हे नागरिक विविध जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे संबंधित जिल्हा प्रशासनाला संपर्क करुन  तपासणी करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यास सांगितले आहे. 

पुणे : ,पुण्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची दिसून येत असून सोमवारी दोनवर असणारी बाधितांची संख्या आता पाचवर पोचल्याचे समजते आहे. सोमवारी कोरोनाची लागण झालेल्या दाम्पत्याशी संबंधित आणखी दोन आणि इतर एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे सूत्रांकडून समजते आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनाचा वेगाने प्रादुर्भाव होताना दिसत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, साेमवारी रात्री पुण्यातील एका दांपत्याला काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले. हे दाेघेही फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुबई येथे फिरण्यास गेले हाेते. एक मार्च राेजी ते भारतात परतले. या दाेघांपैकी महिलेला त्रास झाल्याने त्यांनी काेराेनाबाबतची तपासणी करुन घेतली. यावेळी त्या महिलेला काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले. त्या महिलेच्या पतीचीसुद्धा तपासणी करण्यात आली त्या रिपोर्ट्सनुसार त्यांनाही लागण झाल्याचे समजते आहे. या दांपत्यासाेबत 40 अन्य पर्यटक दुबईला एका फिरण्यास गेले हाेते. या 40 लाेकांची नावे आणि संपर्क क्रमांक प्रशासनाकडे उपलब्ध असून हे नागरिक विविध जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे संबंधित जिल्हा प्रशासनाला संपर्क करुन  तपासणी करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यास सांगितले आहे. 

    

पुण्यात संबंधित कोरोनाग्रस्त दाम्पत्याच्या मुलीला आणि त्यांना मुंबईहून पुण्यापर्यंत घेऊन आलेल्या ओला ड्रायव्हरलाही कोरोना झाल्याचे समजते आहे. याशिवाय आणखीही एका व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. याबाबत प्रशासनाने कोणतीही अधिकृत माहिती दिली नसली तरी रात्री आज दिवसभराच्या घडामोडींची माहिती देण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४५वर पोचली आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाPuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका