शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : लस शोधण्यासाठी ८३ संस्थांचे प्रयत्न, ६ ठिकाणी मानवी चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 06:34 IST

भारतासह जगभरातील ८३ कंपन्या औषध तयार करण्यासाठी काम करीत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले.

विशाल शिर्केपुणे : जगभरात ‘कोविड-१९’चा फैलाव वेगाने होत असून त्यावर लवकरात लवकर लस शोधण्यासाठी संशोधक आणि औषध कंपन्या अहोरात्र झटत आहेत. भारतासह जगभरातील ८३ कंपन्या औषध तयार करण्यासाठी काम करीत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले. यातील ६ संस्था लशीची मानवी चाचणी करीत आहेत. तर, ७७ कंपन्यांची प्रयोगशाळेत चाचण्या सुरू आहेत.शुक्रवारी दुपारपर्यंत जगभरातील बाधितांची संख्या २७ लाख २० हजारांवर पोहोचली होती. मृतांचा आकडाही १ लाख ९२ हजारांवर गेला. भारतातील बाधितांचा आकडा शुक्रवारी दुपारी २३ हजार ५०० वर गेला होता. त्यात मृतांची संख्या ७२२ असून, पाच हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी त्यावर लवकर लस शोधणे, हाच प्रभावी उपाय आहे. त्यासाठी औषध कंपन्या विविध नामांकित विद्यापीठातील शास्त्रज्ञ झटत आहे. चीन, ब्रिटन आणि अमेरिकेमधे काही रुग्णांवर चाचण्या घेण्यात आल्या. मात्र, त्याला म्हणावे तसे यश आलेले नाही. मात्र, प्रत्येक अपयश आणि मार्यादित स्वरूपाच्या यशामधून प्रभावी लसनिर्मितीला आणखी बळ मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार बीजिंग इन्स्टिट्यूट आॅफ बायोटेक्नॉलॉजी, सिनोव्हॅक आणि वुहान इन्स्टिट्यूट बायोलॉजिकल प्रॉडक्ट या चीनमधील कंपन्यांनी मानवी चाचणीस सुरुवात केली आहे. ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी आॅफ आॅक्सफर्ड, अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्सची मॉडर्नाएनआयएआयडी व इनोव्हिओ फार्मास्युटीकल्स या संस्था लशींची मानवी चाचणी घेत आहेत. प्री क्लिनिकल ट्रायलमधे भारतामधील पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटचादेखील सामावेश असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे. जपानचे ओसाका विद्यापीठ व नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इन्फेक्शिअस डिसीज, थायलंडची बायोनेट एशिया, बेल्जियमची जानसीन फार्मा., अमेरिकेतील व्हॅक्सआर्ट, स्पेनमधील सेंट्रो नॅसिओनल बायोटेक्नोलॉजिया, कॅनडाची आयएमव्ही, जर्मन सेंटर फॉर इन्फेक्शन रीसर्च, युनिव्हर्सिटी आॅफ हाँगकाँग, आॅस्ट्रेलियातील डोहेर्टी विद्यापीठ अशा विविध संशोधन संस्था, विद्यापीठे आणि औषध कंपन्यांचे संशोधक लस निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.>कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरात ३०० ठिकाणी प्रयोग सुरू आहेत. विषाणूवर लस तयार करताना तीन पातळींवर प्रयोग केले जातात. पहिल्या टप्प्यामधे प्रयोगशाळेत विशिष्ट औषधाचा काय परिणाम होतो ते तपासले जाते. दुसऱ्या टप्प्यात प्राण्यांवर काय परिणाम होतात, हे तपासतात. तर, तिसºया टप्प्यात मानवी चाचणी केली जाते. नव्या लशीची निरोगी व्यक्तीवर चाचणी केली जाते. लस दिल्यानंतर संबंधित विषाणूविरोधात प्रतिपिंड (अँटीबॉडी) तयार होतो ना, त्याच्या हृदय आणि किडनीवर काही परिणाम होत नाही ना, हेदेखील तपासले जाते. अनेकदा अत्यवस्थ रुग्णांवरदेखील नव्या लशीचा प्रयोग केला जातो.- डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस