शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: डॉक्टर, नर्सचे हॉटेल बिल कोटींच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 05:21 IST

पुण्यातील कोरोना योद्धे : जिल्हा आपत्तीचा निधी संपला

- सुषमा नेहरकर-शिंदे पुणे : तीन महिन्यांपासून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या सरकारी आणि खासगी डॉक्टर, नर्सची रुग्णालयांच्या लगत विविध हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. परंतु हॉटेलमालकांनी प्रतिव्यक्ती प्रतिदिनसाठी तब्बल २ हजार रुपयांचा दर लावला आहे. यापैैकी एका हॉटेलने तब्बल ८६ लाख ७१ हजार रुपयांचे बिल जिल्हाधिकारी कार्यालयाकडेसादर केले आहे. इतर हॉटेलसुद्धा अशीच बिले काढण्याची शक्यता आहे.सध्या जिल्हा आपत्ती प्रतिसाद खात्यामध्ये असलेला निधी इतर अत्यावश्यक गोष्टींसाठी खर्च झाला असून, या व इतर हॉटेलची कोट्यवधी रुपयांची बिले कशी अदा करायची, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.पुण्यात सुरुवातीला एक महिना केवळ नायडू हॉस्पिटलमध्येच कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात होते. एप्रिलमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढायला लागली. त्यामुळे प्रशासनाने ससून रुग्णालय व अन्य काही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात केली. यासाठी सरकारीसह काही नामांकित खासगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहित करुन त्यांना कोरोनाबाधितांवर उपचार करण्यास सांगण्यात आले. खासगी डॉक्टरांनी आपली राहण्याची सोय हॉटेलमध्ये करावी, अशी मागणी केली.ससून रुग्णालयामध्ये काम करणाºया वरिष्ठ, निवासी डॉक्टरांसह नर्सची हॉटेलमध्ये सोय केली. सध्या ५०० ते ६०० सरकारी व खासगी डॉक्टर, नर्स यांची विविध हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे.कोट्यवधींचे बिल भरायचे कुठून?जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत पुण्यासाठी ७२ लाख १२ हजार रुपयांचा निधी देण्यात आला होता. यापैकी १४ लाख विभागीय व्यवस्थापक रेल्वे यांना विशेष श्रमिक रेल्वे खर्चासाठी, ६ लाख विश्वानंद परिपूर्ण आयुर्वेदिक चिकित्सालय यांना, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांना १५ लाख रुपये आणि पुणे शहर तहसीलदार यांना १५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हॉटेल बिलांसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडे निधी शिल्लक नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या