शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : मजुरांना कर्नाटकात घेऊन जाणारा ट्रक बिबवेवाडी पोलिसांनी केला जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 19:30 IST

मजूरांना घेऊन कर्नाटकला जाणाऱ्या ट्रकवर बिबवेवाडी पाेलिसांनी कारवाई केली असून ट्रक जप्त करण्यात आला आहे.

पुणे : राज्यात तसेच शहरात लॉकडाऊन अणि संचारबंदी लागू असताना देखील एका ट्रकमध्ये तब्बल 30 महिला, 40 पुरूष आणि लहान मुलांना घेऊन निघालेला ट्रक बिबवेवाडी पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिस ठाण्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनक कायदा 2005 च्या कलमानुसार व महाराष्ट्र कोविड 2019 च्या उपायोजना कलम 11 अन्वये ट्रक चालक, कॉन्ट्रॅक्टर आणि कामगार ठेकेदार यांच्यावर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंद करून ट्रक जप्त करण्यात आला.  

संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या आदेशानुसार सहायक पोलिस निरीक्षक पावस, उपनिरीक्षक थोरात, बोराटे, कर्मचारी पाटील, म्हस्के असे बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ते बिबवेवाडीतील विघ्नहर कॉलनी येथे आले असताना त्या ठिकाणाहून त्यांना एक ट्रक जाताना दिसला. स्टाफच्या मदतीने त्यांनी त्या ट्रकला थांबविले. ट्रक चालकाला त्याचा नाव आणि पत्ता विचारल्यानंतर त्याने त्याचे नाव राहुल लक्ष्मण जगताप असल्याचे व बिबवेवाडी येथे राहत असल्याचे सांगितले. 

ट्रकची पाहणी केल्यानंतर ट्रकमध्ये त्यांना तब्बल 30 महिला, 40 पुरूष आणि 15 लहान मुले कोंबून बसविल्याचे आढळले. त्यानंतर नागरिकांना घेऊन जाण्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की, ट्रकमधील नागरिक हे मुळ कर्नाटक येथील राहणारे असून ते पुणे येथे मजुरी काम करतात.  लॉकडाऊनमुळे त्यांना काम नसल्यामुळे त्यांचे ठेकेदार अरिविंद पासलकर व  रमेश जाधव यांनी त्यांना कर्नाटक येथे घेऊन जाण्यास सांगितल्याचे तपासात निष्पन्न झाले. परंतु, त्यांच्याकडे कर्नाटक येथे जाण्यासाठी कोणताही परवाना नसल्याचे दिसून आले आहे.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस